नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या

​नांदेड – जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार, नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मारोती श्रीराम मुंडे यांची नियुक्ती आता शहर वाहतूक शाखा, वजिराबाद येथे करण्यात आली आहे. तसेच, वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर बंकटराव कदम यांची हदगाव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित पोपट कुंभार यांची वजिराबाद येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
​यासोबतच शहर वाहतूक शाखा वजिराबाद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत टिकाराम नागरगोजे यांची सोनखेड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, भोकर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंभार यांची बदली झाल्यामुळे, तेथील रिक्त पदाचा तात्पुरता अतिरिक्त प्रभार सपोनि शैलेंद्र आवटे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आदेशात नमूद केलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने आपापल्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी पदभार स्वीकारून तसा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    Nanded Vruttavedh ​नांदेड – महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (Special Intensive Revision) सुधारित कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोकण, मुंबई आणि राज्यातील इतर काही भागांमध्ये…

    Continue reading
    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    Nanded Vruttavedh नांदेड – ​मुंबई विभागात ठाकूरवाडी ते मंकीहिल स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांच्या सेवेत तात्पुरते बदल केले…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

    मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

    शिक्षणाचा बाजार: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा क्रूर लिलाव

    शिक्षणाचा बाजार: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा क्रूर लिलाव

    आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोला

    आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोला