नांदेडमध्ये ५० हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक लाचलुचपतच्या जाळ्यात

​नांदेड – मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गोविंदराव पडलवार (वय ५१ वर्षे, रा. शारदानगर, नांदेड) यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. ३ जून २०२६) आरोपीच्या शारदानगर येथील राहत्या घरी करण्यात आली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात आणि शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
​तक्रारदार हे हुतात्मा माधव विद्यालय मुखेड येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. आरोपी मुख्याध्यापक पडलवार यांनी तक्रारदाराकडे विद्यालयाच्या शालेय खर्चाच्या नावाखाली प्रतिमहिना १२ हजार रुपये प्रमाणे जानेवारी ते मे २०२६ अशा पाच महिन्यांच्या हप्त्याची, तसेच तक्रारदाराची बदली करून देण्यासाठी व त्यांना नोटीस न देण्यासाठी एकूण ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या जाचाला कंटाळून लिपिकाने नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती.
​लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता, मुख्याध्यापकाने शासकीय पंचांसमक्ष ६० हजारांऐवजी तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार बुधवारी शारदानगर येथील आरोपीच्या निवासस्थानी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ५० हजारांची लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पडलवार यांना रंगेहात अटक केली. लाचेची रक्कम आणि आरोपीची अंगझडती घेऊन मोबाईल व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, सध्या त्यांच्या घराची झडती आणि विमानतळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

    Nanded Vruttavedh एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन Nanded Vruttavedh नांदेड – येथील बंद पडलेली एन. टी. सी. उस्मानशाही मिल पूर्ववत सुरू करण्यात यावी, या मुख्य…

    Continue reading
    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    Nanded Vruttavedh नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन नांदेड – ​नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे तिथले जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

    एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    भर पावसात हजारोंची उपस्थिती! महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

    भर पावसात हजारोंची उपस्थिती!  महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना