खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

Nanded Vruttavedh ।

हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप

​नांदेड – खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह विठ्ठल पावडे, अब्दुल गफार, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, मुन्ना अब्बास हुसैन व इतर ५० ते ६० लोकांनी एकत्र येत प्रक्षोभक घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी या सर्वांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अमोल श्रीराम कुलथिया यांनी पोलिसांकडे केली आहे.
​नांदेड येथील फुले पुतळा, आयटीआय चौकात ही घटना घडली आहे. तक्रारदार अमोल श्रीराम कुलथिया पूर्णावाला (वय ४६, व्यवसाय – व्यापार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांनी बेकायदेशीर मंडळी जमवून हिंदू धर्माच्या विरोधात अश्लील व द्वेषपूर्ण भावनेने प्रक्षोभक घोषणा दिल्या. यामुळे हिंदू-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
​या घटनेचा व्हिडिओ सध्या नांदेड शहरात तसेच सोशल मीडियावर (व्हॉट्सॲप ग्रुप व इंस्टाग्राम) मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन शिवाजीनगर, नांदेड यांच्याकडे दि. २३/०८/२०२६ रोजी तक्रार अर्ज देऊन दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून पाऊल उचलावे, अशी ठाम मागणी अमोल श्रीराम कुलथिया यांनी केली आहे.
दरम्यान, या वक्तव्याबद्दल खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    नांदेडमध्ये अवैध गावठी पिस्तुलांची विक्री करणारी टोळी गजाआड; ४ पिस्तुले व १३ जिवंत काडतुसांसह १.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त ​नांदेड जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन…

    Continue reading
    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    सुरेश गायकवाड यांचा ६९ वा वाढदिवस नांदेडमध्ये उत्साहात साजरा; ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – गायकवाड यांचे आवाहन Nanded Vruttavedh । ​नांदेड – आंबेडकरवादी लोक मंचच्या वतीने काँग्रेसच्या अनुसूचित जाती…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    भर पावसात हजारोंची उपस्थिती! महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

    भर पावसात हजारोंची उपस्थिती!  महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक