हवामान विभागाचा नांदेड जिल्ह्यासाठी ‘येलो’ अलर्ट: मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांनी काळजी घ्यावी

हवामान विभागाचा नांदेड जिल्ह्यासाठी ‘येलो’ अलर्ट: मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांनी काळजी घ्यावी

नांदेड -प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबईने दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ११ ते १५ सप्टेंबर २०२५ या पाच दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे. या काळात जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वादळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रति तास असू शकतो. त्याचप्रमाणे, ११, १३, १४ आणि १५ सप्टेंबर २०२५ रोजी तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आणि सर्व संबंधित यंत्रणांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
या हवामानामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी खालील गोष्टींचे पालन करावे.
काय करावे?
* विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता असल्यास घराबाहेर पडणे टाळा.
* मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास सुरक्षित इमारत नसेल, तर लगेच सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
* घराबाहेर असताना आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत किंवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
* घरातील विद्युत उपकरणे चालू असल्यास, ती त्वरित बंद करा.
* तारांचे कुंपण, विजेचे खांब आणि इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहा.
* पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
काय करू नये?
* विजा चमकत असताना लँडलाईन फोनचा वापर करू नका. तसेच शॉवरखाली आंघोळ करू नका.
* घरातील बेसिनचे नळ आणि पाण्याच्या पाईपलाइनला स्पर्श करू नका.
* लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
* उंच झाडाच्या खाली उभे राहू नका.
* धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ थांबणे टाळा.
* घरात असताना उघड्या दरवाजातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
या सूचनांचे पालन करून नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेड : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अर्धापूर पोलीस…

    Continue reading
    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम नांदेड – प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा तसेच अनियमित…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त