महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण आहार महत्वाचा – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण आहार महत्वाचा – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

बालविकास प्रकल्प कार्यालय, नांदेड शहर तर्फे आयोजित आठव्या पोषण माह चा समारोप

नांदेड – बाल विकास प्रकल्प कार्यालय नांदेड शहर तर्फे आठव्या राष्ट्रीय पोषण माह चा समारोप साई लॉन्स येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डीले होते. त्यांनी यावेळी बालक व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच अंगणवाडी केंद्राना सक्षम करण्यासाठी खेळणी, इतर साहित्य पुरवले जाईल व शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये वर्ग उपलब्ध असल्यास तिथे अंगणवाडी भरविण्याची परवानगी देण्यात येईल असे सांगितले.

बाल विकास प्रकल्प कार्यालय, नांदेड शहर च्या वतीने राष्ट्रीय पोषण महिन्यात राबविलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.  याप्रसंगी सर्व मदतनीस व सेविका यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून 30 हजार रुपये रक्कम दिली.
कार्यक्रमास लेखाधिकारी नीलकंठ पाचंगे, वैद्यकीय अधिकारी रिठे, बाल न्याय मंडळ सदस्या सुप्रिया गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पोषण माह दरम्यान राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

पोषण माह दरम्यान उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पर्यवेक्षिका, सेविका व मदतनीस यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.  यावेळी पाककला आयोजित करण्यात आली होती.  पोषण व आरोग्य यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांनी केली.  या दरम्यान त्यांनी महिनाभर राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.  आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका गोदावरी गुंडारे यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील सर्व पर्यवेक्षिका गुंडारे, शकुंतला पेंदे, शिसोदे, गरुड, प्रतिभा खिराडे, राहेगावकर, आऊलवार, खूपसे, यांनी प्रयत्न केले. या प्रसंगी प्रकल्पातील सर्व मदतनीस, सेविका व पालक वर्ग उपस्थित होते.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

    Nanded Vruttavedh एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन Nanded Vruttavedh नांदेड – येथील बंद पडलेली एन. टी. सी. उस्मानशाही मिल पूर्ववत सुरू करण्यात यावी, या मुख्य…

    Continue reading
    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    Nanded Vruttavedh नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन नांदेड – ​नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे तिथले जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

    एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    भर पावसात हजारोंची उपस्थिती! महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

    भर पावसात हजारोंची उपस्थिती!  महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना