अबब! ७५ लाखांचे साहित्य जिलेटीनने उडवले; मुदखेडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

मुदखेडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई; ७५ लाखांचे साहित्य जिलेटीनने उडवले

​ नांदेड : मुदखेड पोलीस आणि महसूल विभागाने वासरी शिवारातील गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर शनिवारी, ३१ जानेवारी २०२६ रोजी मोठी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन बोटी, इंजिन आणि हॉपरसह एकूण ७५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, जप्त केलेले साहित्य अवजड असल्याने प्रशासनाने ते जागीच जिलेटीनच्या साहाय्याने ब्लास्ट करून नष्ट केले आहे.
नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली होती. ३१ जानेवारी रोजी सकाळी साडे १० वाजेच्या सुमारास मुदखेड पोलीस व महसूल विभागाच्या पथकाला वासरी शिवारात अवैध उपसा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. पथक घटनास्थळी पोहोचले असता, वाळू उपसा करणारे तीन अज्ञात आरोपी पथकाला पाहून तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.
या कारवाईत पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीच्या ३ छोट्या बोटी व लोखंडी इंजिन, ६० लाख रुपये किमतीचे ३ हॉपर आणि ३० हजार रुपयांचे दोन थर्माकॉल तराफे असा एकूण ७५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पर्यावरणाची काळजी घेत, हे सर्व साहित्य हलवणे कठीण असल्याने अधिकाऱ्यांनी ते जागेवरच स्फोट घडवून नष्ट करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ६२, ३(५) आणि महाराष्ट्र महसूल अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेडचे पोलीस निरीक्षक धिरज चव्हाण, तहसीलदार आनंद देऊळगांवकर व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी सहभागी सर्व अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बंडू गवई करत आहेत.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    Nanded Vruttavedh ​नांदेड – महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (Special Intensive Revision) सुधारित कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोकण, मुंबई आणि राज्यातील इतर काही भागांमध्ये…

    Continue reading
    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक Nanded Vruttavedh ​नांदेड – जिल्हा पोलीस आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कामगिरी करत पंजाब राज्यातील हेरॉईन (अंमली पदार्थ) तस्करीच्या गंभीर…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

    मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

    शिक्षणाचा बाजार: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा क्रूर लिलाव

    शिक्षणाचा बाजार: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा क्रूर लिलाव

    आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोला

    आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोला