महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँ

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला निवडणुकीत धडा शिकवा-खा. अशोक चव्हाण

नांदेड-महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असते तर विधानसभा ,लोकसभेत अनेक कर्तृत्वान महिलांना संधी मिळाली असती. यातून राज्य व देशाच्या विकासात त्यांना भरीव योगदान देता आले असते. मात्र क्रेडिट मोदी सरकारला जाईल या राजकीय हेतूने महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेससह विरोधी पक्षाला येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचाईत समिती निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन माजी मुख्यमंत्री,खा.अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरतर्फे नारीशक्ती वंदन कार्यक्रम व महानगर जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवार दि. 1 मे रोजी सायंकाळी पाच वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय समारोपात माजी मुख्यमंत्री,खा.अशोकराव चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस ,तथा जिल्हा प्रभारी माजी आ. सुनील राणे,,आ.श्रीजया चव्हाण ,प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे ,चैतन्यबापू देशमुख ,माजी मंत्री डी. पी.सावंत, महानगराध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर ,महापौर कविता मुळे,उपमहापौर दिपकसिंघ रावत ,स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले ,महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी,उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी ,विजय येवणकर ,प्रवीण साले,माजी महापौर जयश्री पावडे ,शैलजा स्वामी ,शीला भवरे ,मंगारानी अंबुलगेकर ,ज्योती कल्याणकर ,सुषमा थोरात ,उपसभापती लांडगे ,दिलीप ठाकूर ,विजय गंभीरे,शशिकांत क्षिरसागर ,दत्तू देशमुख ,सुरेश लोट ,शीतल खांडील यांच्यासह महानगर पदाधिकारी, सर्व नगरसेवक, सर्व मंडल कार्यकारिणी, सर्व मोर्चा व प्रकोष्ठ कार्यकारिणी, शक्ती केंद्र व बूथ तसेच सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना खा. चव्हाण म्हणाले की,नारीशक्ती वंदन अधिनियमन ,महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असते तर महिलांच्या संधीत वाढ झाली असती लोकसभा ते ग्रामपंचायत महिलांना काम करता आले असते. मात्र काँग्रेस ,विरोधी पक्षाच्या नकारात्मक भूमिकेमुळे महिलांची अपेक्षित संधी हिरावल्या गेली आहे. महिलांना सत्तेत अपेक्षित स्थान नाकारणाऱ्याना लोकशाहीत स्थान नाही.आगामी काळात जनतेच्या भक्कम साथीने दोन तृतीयांश बहुमताच्या बळावर महिला आरक्षण मंजूर करून महिलांना त्यांचा हक्क देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची राहणार आहे.विकासात आता आपण थांबणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र ,विकसित मराठवाडा ,नांदेड हे आपले विकासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता ,नवनवीन तंत्रज्ञान युवकांनी आत्मसात करावेत. नांदेडात प्रथमच महापालिकेत भाजपाची सत्ता आली आहे. आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून नांदेडात स्थानिक स्वराज्य ते लोकसभा भाजपाचा विजयाचा ट्रेंड कायम राहील असा विश्‍वास खा. चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    Nanded Vruttavedh ​नांदेड – महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (Special Intensive Revision) सुधारित कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोकण, मुंबई आणि राज्यातील इतर काही भागांमध्ये…

    Continue reading
    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    Nanded Vruttavedh नांदेड – ​मुंबई विभागात ठाकूरवाडी ते मंकीहिल स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांच्या सेवेत तात्पुरते बदल केले…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

    मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

    शिक्षणाचा बाजार: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा क्रूर लिलाव

    शिक्षणाचा बाजार: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा क्रूर लिलाव

    आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोला

    आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोला