रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

नांदेड – प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा तसेच अनियमित प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेवर नांदेडचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक,  शैलेश कुमार सिंह यांनी देखरेख ठेवली.

या विशेष मोहिमेत 28 तिकीट तपासणी कर्मचारी सहभागी झाले होते.  यावेळी विविध मार्गांवरील 25 गाड्यांची तपासणी करण्यात आली. या सखोल तपासणीदरम्यान विनातिकीट प्रवास, अनियमित प्रवास तसेच अनारक्षित सामान यांची एकूण 500 प्रकरणे आढळून आली.   त्यावर रेल्वे नियमांनुसार कारवाई करण्यात आली.

यामध्ये 449 विनातिकीट प्रवास (TWT) प्रकरणांमधून 2 लाख 14 हजार 410 भाडे व 1 लाख 15 हजार 190 दंड वसूल करण्यात आला. तसेच 15 अनियमित प्रवास (IRT) प्रकरणांमधून 3 हजार 730 भाडे व 3 हजार 750 दंड वसूल करण्यात आला. याशिवाय 36 अनारक्षित लगेज (UBL) प्रकरणांमधून 5 हजार 500 रक्कम वसूल करण्यात आली.  अशा प्रकारे या एकदिवसीय विशेष मोहिमेत 500 प्रकरणांमधून एकूण 3 लाख 42 हजार 580 इतकी रक्कम वसूल करण्यात आली.

दरम्यान, प्रवाशांनी नेहमी वैध तिकीटासहच प्रवास करावा तसेच प्रवासादरम्यान सोबत असलेले सामान नियमानुसार बुक करावे. विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणे हे रेल्वे कायद्यांतर्गत दंडनीय अपराध आहे. सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवासासाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेड : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अर्धापूर पोलीस…

    Continue reading
    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    नांदेड :-प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 24 मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 24 व 25 मार्च 2026 या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 24…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त