आ. रोहित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर; शेतकरी कर्जमाफी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

आ. रोहित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर; शेतकरी कर्जमाफी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

नांदेड – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार हे उद्या, २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता नांदेड येथे येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी दिली आहे. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी त्यांनी यापूर्वी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने केवळ आश्वासन दिले, मात्र त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे २९ जून रोजी ते पुन्हा आंदोलन करणार असून, याच पार्श्वभूमीवर त्यांचा हा नांदेड दौरा होत आहे.

​नांदेडला आगमन झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेतील. तसेच रात्री ८:३० वाजता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. बैठकांनंतर रात्री ९ वाजता ते सचखंड गुरूद्वारा येथे दर्शन घेतील.

​दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २६ जून रोजी सकाळी, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला आमदार पवार अभिवादन करतील. या अभिवादन कार्यक्रमानंतर त्यांचा पुढील दौरा सुरू होईल. आमदार रोहित पवार यांच्या विविध बैठका आणि स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी केले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोला

    Nanded Vruttavedh नांदेड : खा. अशोक चव्हाण हे राज्याचे नेते होते, आहेत व राहतील, यात तीळमात्र शंका नाही. त्यांचा सन्मान व त्यांना न्याय देण्याचा विषय भाजप श्रेष्ठी पाहतील. परंतु, तुम्ही…

    Continue reading
    विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; नांदेडमधून अमरनाथ राजूरकर यांना पुन्हा संधी

    नांदेड : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक आणि पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. नांदेडमधून भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

    मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

    शिक्षणाचा बाजार: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा क्रूर लिलाव