नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

नांदेड शहरात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव; निधी व जागा संपादन करण्याबाबत सभेत घेतला जाणार निर्णय

नांदेड: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा सोमवार, दि. १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. महापौर कविता संतोष मुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील चौथ्या मजल्यावरील कै. शंकरराव चव्हाण सभागृहात पार पडणार आहे. या सभेमध्ये स्थायी समिती आणि इतर विशेष समित्यांच्या निवडीचा मुख्य अजेंडा असणार आहे.

या सभेतील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील सुधारित कलम ३१-अ नुसार स्थायी समितीवर नामनिर्देशनाद्वारे १६ सदस्यांची निवड करणे हा आहे. महापालिकेतील विविध पक्ष आणि आघाड्यांच्या तौलनिक संख्याबळानुसार या जागांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीला सर्वाधिक १० जागा, तर काँग्रेस वंचित बहुजन आघाडी नांदेड लोकन्याय विकास आघाडी आणि एमआयएम (AIMIM) पक्षाला प्रत्येकी ३ जागा मिळण्याचे प्रलंबित आहे.

स्थायी समितीसोबतच शिक्षण महिला व बालकल्यण समितीवर ११ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. नियमानुसार, या समितीमध्ये किमान ७५ टक्के म्हणजेच एकूण ८ महिला सदस्यांची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. या समितीवर देखील पक्षीय बलाबलानुसार महायुतीला ७, तर काँग्रेस वंचित बहुजन आघाडी लोकन्याय विकास आघाडी आणि एमआयएमला प्रत्येकी २ जागांचे वाटप निश्चित करण्यात आले आहे.

समित्यांवरील नियुक्तीसाठी सदस्यांची नावे पाठवताना ती बंद पाकिटात महापौरांकडे सभेच्या वेळी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर ही नावे सभेपूर्वी द्यायची असतील, तर त्याची एक प्रत आयुक्तांनाही बंद पाकिटात देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमुळे समित्यांच्या निवडीत कमालीची गुप्तता पाळली जाणार असून, राजकीय वर्तुळात कोणत्या सदस्यांना संधी मिळते, याची उत्सुकता वाढली आहे.

या सभेमध्ये केवळ समित्यांच्या निवडीच नव्हे, तर शहराच्या सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रस्तावही चर्चेला येणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा शहरातील योग्य ठिकाणी उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याची माहिती नवीन पिढीला व्हावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा पुतळा उभारणे, त्यासाठी निधी मंजूर करणे आणि जागा संपादनाची कार्यवाही करणे यावर सभा निर्णय घेणार आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेड : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अर्धापूर पोलीस…

    Continue reading
    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम नांदेड – प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा तसेच अनियमित…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त