नांदेडमध्ये ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ६ ट्रॅक्टरसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेडमध्ये ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ६ ट्रॅक्टरसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. नांदेड जिल्हयातील विविध भागांतून ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ६ ट्रॅक्टर आणि २ मोटारसायकल असा एकूण १७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत आरसेवार आणि त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सुनील सिंगणापूरे हा आपल्या साथीदारांसह चोरीचा ट्रॅक्टर विक्री करण्यासाठी भोकर फाटा येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सहा संशयितांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांनी गेल्या एक महिन्यापासून उमरी, नायगाव, अर्धापूर आणि भोकर परिसरातून ६ ट्रॅक्टर चोरल्याची कबुली दिली. हे ट्रॅक्टर त्यांनी दिग्रस ते देगाव दरम्यान लोणार नदीच्या पात्रात लपवून ठेवले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून ‘जॉन डियर’ कंपनीचे ५ आणि ‘स्वराज’ कंपनीचा १ असे एकूण ६ ट्रॅक्टर जप्त केले आहेत.

या प्रकरणी सुनील मारोती सिंगणापूरे (रा. सिंधी, ता. उमरी), उकंडी ऊर्फ बालाजी संभाजी पवार (रा. रुई, ता. हदगाव), बालाजी किशन गळाफोडे (रा. बाबूळगाव, ता. नांदेड), ओमकार अनिल पवार (रा. पाथरड, ता. हदगाव), मारोती ऊर्फ बजरंग पांडूरंग तेलंग (रा. रूई, ता. नायगाव), उत्तम धनराज राठोड (रा. मदनापूर, ता. किनवट)

या गुन्ह्यात सचिन तुळशीराम शिंदे, मधुकर किशन गळाफोडे आणि शिवाजी बबन गडमवार हे तीन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालासह आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या

    क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या ​ ​नांदेड/मुखेड: राजकारणाची आणि सत्तेची हाव माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक अत्यंत विदारक…

    Continue reading
    विष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यश

    विष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यश ​नांदेड : विष्णुनगर भागात रविवारी पहाटे लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी जीवितहानी व वित्तहानी…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या

    क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या

    विष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यश

    विष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यश

    अबब! ७५ लाखांचे साहित्य जिलेटीनने उडवले; मुदखेडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    अबब! ७५ लाखांचे साहित्य जिलेटीनने उडवले; मुदखेडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    लातूर आणि नांदेडमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; पिस्तुलसह ८ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त

    लातूर आणि नांदेडमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; पिस्तुलसह ८ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त

    नांदेडमध्ये ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ६ ट्रॅक्टरसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

    नांदेडमध्ये ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ६ ट्रॅक्टरसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

    विणकर कॉलनी ते लुंबिनीनगर रस्त्यावरील ड्रेनेजचे काम रखडले; शालेय विद्यार्थी आणि नागरिक मेटाकुटीला!

    विणकर कॉलनी ते लुंबिनीनगर रस्त्यावरील ड्रेनेजचे काम रखडले; शालेय विद्यार्थी आणि नागरिक मेटाकुटीला!