कर्नाटकच्या टोळीकडून १८ लाखांची रोकड जप्त, नांदेडात बॅग लिफ्टिंगचा गुन्हा उघड; स्थागुशा व वजिराबाद पोलीसांची संयुक्त कारवाई

कर्नाटकच्या टोळीकडून १८ लाखांची रोकड जप्त, नांदेडात बॅग लिफ्टिंगचा गुन्हा उघड; स्थागुशा व वजिराबाद पोलीसांची संयुक्त कारवाई

नांदेड: जिल्ह्यातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना मोंढा परिसरात झालेला बॅग लिफ्टिंगचा मोठा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातून एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचे १८ लाख रुपये रोख हस्तगत केले आहेत.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा अशा तीन राज्यांत फिरवली होती. तपासादरम्यान सुमारे २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, ५० लोकांचे सायबर फूटप्रिंट्स आणि १५ लोकांचे नॅटग्रिड डिटेल्स तपासण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोल्हापूर, सांगली, ठाणे, मुंबईसह बिदर आणि तेलंगणात तळ ठोकून होते. दरम्यान, १५ डिसेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांना हा गुन्हा कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील टोळीने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड पोलिसांनी शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. १८ डिसेंबर रोजी चंद्रशेखर ओमप्रकाश छत्री (४५, रा. भद्रावती, जि. शिमोगा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याने आपले साथीदार अजय बाबू जाधव, नंदकुमार दिलीप चंदू आणि अंजन्नेलु छत्री यांच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी आरोपीकडून १८ लाख रुपये जप्त केले असून, इतर फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तपासी पथकाचे कौतुक केले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

    नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश नांदेड: नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी विशेष मोहीम हाती…

    Continue reading
    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेड : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अर्धापूर पोलीस…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

    नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त