नांदेडात गणेशोत्सव ‘डीजेमुक्त’ साजरा करण्यासाठी २५० मंडळांचा पुढाकार; जिल्हा प्रशासनाकडून गणेश मंडळांचा सत्कार 

नांदेडात गणेशोत्सव ‘डीजेमुक्त’ साजरा करण्यासाठी २५० मंडळांचा पुढाकार; जिल्हा प्रशासनाकडून गणेश मंडळांचा सत्कार

नांदेड – नांदेड जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत आणि आनंदाने साजरा करण्यासाठी ‘पर्यावरणपूरक आणि डीजेमुक्त’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमातून नांदेड जिल्ह्याची एक नवीन ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलेल्या जिल्ह्यातील सुमारे २५० गणेश मंडळांचा सत्कार जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे करण्यात आला. यावेळी या मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
डीजेच्या आवाजाचे दुष्परिणाम, विशेषतः हृदयावर होणारे वाईट परिणाम लक्षात घेऊन जिल्ह्यातील २५० गणेश मंडळांनी स्वतःहून पुढे येऊन ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सव साजरा करण्याची हमी दिली, ही बाब कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. समाजातील नागरिकांनी स्वयंशिस्तीने पुढाकार घेतल्यास अनेक चांगल्या गोष्टी आणि उपक्रम राबवता येतात, असे ते म्हणाले. गणेश मंडळांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमीच तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्व गणेश मंडळांचे आभार मानले. उत्सव काळात शांतता राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य मिळते, त्यामुळे चांगले नियोजन करता येते, असे ते म्हणाले. त्यांनी गणेश मंडळांना विसर्जन काळात रस्ते मार्गात बदल न करण्याचे आणि वेळेचे बंधन पाळण्याचे आवाहन केले.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी, उत्सव काळात शांतता राखण्यात समाजाचा मोठा सहभाग असतो, असे सांगितले. ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचे पोलीस दलाने स्वागत केले असून, डीजेचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नारायणा स्कूलचा असंवेदनशील कारभार; ४२ अंश तापमानात विद्यार्थ्यांना भर उन्हात जेवण्यास पाडले भाग

    नांदेड: उन्हाची तीव्रता वाढल्याने एकीकडे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचे आदेश नुकतेच जारी केले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत, शहरातील डी-मार्ट परिसरातील…

    Continue reading
    नांदेड शहरात मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धरपकड

    नांदेड शहरात मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धरपकड ​नांदेड : शहरात चोरी आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ राबविण्यात येत आहे. या…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नारायणा स्कूलचा असंवेदनशील कारभार; ४२ अंश तापमानात विद्यार्थ्यांना भर उन्हात जेवण्यास पाडले भाग

    नारायणा स्कूलचा असंवेदनशील कारभार; ४२ अंश तापमानात विद्यार्थ्यांना भर उन्हात जेवण्यास पाडले भाग

    नांदेड शहरात मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धरपकड

    नांदेड शहरात मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धरपकड

    नांदेड जिल्ह्यात दोन दिवस ‘येलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

    नांदेड जिल्ह्यात दोन दिवस ‘येलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

    नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

    नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम