पोलीस निरीक्षक चिंचोलकरांची पुन्हा भरारी; वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या

गोदावरी पात्रातील अवैध रेती उपसा व वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा छापा; 42.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड – एका प्रकरणावरून काही दिवस मुख्यालय अटॅच करण्यात आलेले नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची ग्रामीण ठाण्यातच नियुक्ती करण्यात आली.  त्यानंतर पुन्हा चिंचोलकरांनी नवी उभारी घेत, वाळू माफियांच्या मुस्क्या आवळायला सुरुवात केली आहे.  ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठी कारवाई करत गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा आणि वाहतूक करणाऱ्या माफियांवर त्यांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी 42 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, विष्णुपुरी शिवारात गोदावरी नदीतून तराफ्यांच्या मदतीने अवैध रेतीचा उपसा सुरू आहे. या माहितीच्या आधारे दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा वाजता पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी, एक आरोपी पोलिसांना पाहून नदीत उडी मारून पळून गेला.
घटनास्थळावरून पोलिसांनी अंदाजे १० ब्रास रेती अंदाजे किंमत 50 हजार रुपये आणि रेती उपसा करण्यासाठी वापरलेले तीन तराफे 1 लाख 50 हजार रुपये असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच, काही साहित्य कटरने कापून आणि जाळून जागेवरच नष्ट करण्यात आले.
याच मोहिमेअंतर्गत, हस्सापूर रोडवरील गोदावरी पुलाजवळ पोलिसांनी MH26BE 4303 या हायवा ट्रकवर छापा टाकला. या ट्रकमध्ये बेकायदेशीरपणे 5 ब्रास रेतीची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी ट्रकचालक हिराचंद संभाजी भोकरे (वय 41) याला ताब्यात घेतले आणि ट्रकसह एकूण 40 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या दोन्ही घटनांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार चार वेगवेगळ्या कायद्यांखाली दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी या यशस्वी कारवाईबद्दल पो. नि. ओमकांत चिंचोलकर यांच्यासह संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेड : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अर्धापूर पोलीस…

    Continue reading
    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम नांदेड – प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा तसेच अनियमित…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त