मीनल करनवाल यांची बदली; मेघना कावली नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी

  • मीनल करनवाल यांची बदली; मेघना कावली नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी

नांदेड-कालच 22 कोटी 26 लाख रुपयांचा नांदेड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची बदली करण्यात आली आहे. जळगाव जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर किनवट येथील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी 18 मार्च रोजी काढण्यात आले. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मागील दीड वर्षांपूर्वी मिनल करनवाल यांची नियुक्ती झाली होती. मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. अचानक निघालेल्या या बदलीच्या आदेशामुळे अनेकांना आश्चर्य वाटू लागले आहे. त्यांच्या जागेवर किनवट येथील प्रशिक्षणार्थी असणाऱ्या प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदीवासी प्रकल्प तथ सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट मेघना कावली यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बदली केल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
दरम्यान मेघना कावली या 2021 च्या आयएएस बॅचच्या अधिकारी असून संपूर्ण भारतातून 83 वा रँक त्यांनी मिळवला होता. मुळात बेंगलुरु कर्नाटक येथील रहिवाशी मेघना कावली यांनी आयटीसीसह देशातल्या महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता घेऊन भारतीय प्रशासनिक सेवेमध्ये समाविष्ट झालेल्या मेघना कावली या नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आल्या आहेत. आता तरी नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण जीवनाचा चेहरामोहरा बदलणार काय? याकडे मेघना कावली यांच्या नियुक्तीने सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँ

    महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला निवडणुकीत धडा शिकवा-खा. अशोक चव्हाण नांदेड-महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असते तर विधानसभा ,लोकसभेत अनेक कर्तृत्वान महिलांना संधी मिळाली असती. यातून राज्य व देशाच्या विकासात…

    Continue reading
    नारायणा स्कूलचा असंवेदनशील कारभार; ४२ अंश तापमानात विद्यार्थ्यांना भर उन्हात जेवण्यास पाडले भाग

    नांदेड: उन्हाची तीव्रता वाढल्याने एकीकडे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचे आदेश नुकतेच जारी केले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत, शहरातील डी-मार्ट परिसरातील…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँ

    महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँ

    नारायणा स्कूलचा असंवेदनशील कारभार; ४२ अंश तापमानात विद्यार्थ्यांना भर उन्हात जेवण्यास पाडले भाग

    नारायणा स्कूलचा असंवेदनशील कारभार; ४२ अंश तापमानात विद्यार्थ्यांना भर उन्हात जेवण्यास पाडले भाग

    नांदेड शहरात मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धरपकड

    नांदेड शहरात मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धरपकड

    नांदेड जिल्ह्यात दोन दिवस ‘येलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

    नांदेड जिल्ह्यात दोन दिवस ‘येलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

    नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

    नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई