जिल्हा परिषदेत अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय

जिल्हा परिषदेत अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय

नांदेड – गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून अनेक नागरिक आपली कामे व तक्रारी घेऊन जिल्हा परिषदेत येत असतात. त्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांच्या निर्देशानुसार ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उन्हाच्या तीव्रतेचा विचार करता जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेशही यापूर्वीच मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांदी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्‍या दालना नजीक अभ्यागतांसाठी विशेष दालन उपलब्ध असून येथे बसण्याची सुविधा तसेच वृत्तपत्रे वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांमध्ये संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अभ्‍यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळावा व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी जिल्‍हा परिषद प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेड : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अर्धापूर पोलीस…

    Continue reading
    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम नांदेड – प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा तसेच अनियमित…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त