76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात
मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

नांदेड – क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त व नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हयात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. यामध्ये जिल्हयातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू पुरुष, महिला व दिव्यांग यांनी केलेल्या कार्याचे, योगदानाचे मुल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या पासुन इतरांनी प्रेरणा घ्यावी या हेतून जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. त्याकरीता जिल्हयातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) यांच्याकडून सन 2020-21, 2021-22, 2022-23, व 2023-24 (4 वर्षे) या वर्षातील पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात आले होते.

या पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या अर्जाची जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती मार्फत छाननी करण्यात आली असून गुणांकनानुसार वर्षेनिहाय पुरस्कारसाठी पात्र झालेल्या पुरस्कारार्थीची नावे खालीलप्रमाणे आहेत. सन 2021-22 करीता गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (पुरुष) सुशिल गणेशराव कुरुडे- जिम्नॅस्टिक्स, सन 2022-23 करीता गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (पुरुष) डॉ. अनिल सुरेंद्र पाटील- जिम्नॅस्टिक्स, सन 2023-24 करीता गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (महिला) श्रीमती वैशाली बालाजी पाटील जोगदंड-आर्चरी, तर गुणवंत खेळाडू म्हणुन सन 2020-21 मार्तंड बालाजी चेरले (पुरुष)-आर्चरी, कु.अंजली अशोक भालेराव (महिला)- जिम्नॅस्टिक्स, सज्जन सुभाष गयाबाई भिमराव (दिव्यांग) मैदानी, सन 2021-22 आकाश मारोती बगाटे (पुरुष)- जिम्नॅस्टिक्स, कु. आकांक्षा मारोती सोनकांबळे (महिला)- जिम्नॅस्टिक्स, गिरबनवाड योगेश निर्मलाबाई गणपतराव (दिव्यांग)- मैदानी, सन 2022-23 जहागीरदार तेजबीर सिंघ चरणकमलजीतसिंघ (पुरुष)- आर्चरी, कु.सौख्या स्वप्ना घेवारे (महिला)- जिम्नॅस्टिक्स, दत्ता व्यंकाबाई देऊबुभा भारती (दिव्यांग)- मैदानी, सन 2023-24 पुजारी कैवल्य कैलास (पुरुष)- जिम्नॅस्टिक्स, कु.सृष्टी बालाजी जोगदंड (महिला)- आर्चरी व पॅरा बॅडमिंटन या खेळामध्ये पॅरा जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिप सन 2022 (टोकीयो- जापान)- ब्रांझ मेडल, पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड ॲबीलीटी क्रीडा स्पर्धा सन 2023 (थायलंड)- तृतीय क्रमांक, पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पीयनशिप सन 2024 (थयलंड)- सहभाग, या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेले असल्याने त्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने सहाय्यक क्रीडा अधिकारी या पदावर थेट नियुक्ती दिलेली असल्यामूळे त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2023-24 गुणवंत खेळाडू (दिव्यांग) म्हणुन कु.लताताई परमेश्वर उमरेकर दिव्यांग बॅडमिंटन यांना थेट पुरस्कार सन 2023-24 प्रदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमकरीता जिल्ह्यातील खेळाडू व क्रीडा प्रेमींनी जास्तीत-जास्त मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    राज्यातील २९ महानगरपालिका आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारीला निकाल 

    राज्यातील २९ महानगरपालिका आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारीला निकाल  नांदेड -महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने घोषित…

    Continue reading
    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज!

    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज! आजच्या गतिमान अर्थव्यवस्थेत मध्यमवर्गीय कुटुंबावर वाढत्या महागाईसोबतच शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रातील खर्चाचे मोठे ओझे आहे. उत्पन्न मर्यादित असताना, हे दोन्ही खर्च दिवसेंदिवस…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    राज्यातील २९ महानगरपालिका आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारीला निकाल 

    राज्यातील २९ महानगरपालिका आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर;  15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारीला निकाल 

    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज!

    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज!

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली