३९ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्या उदघाटन

देश-विदेशातील विद्वान भिक्खूंच्या धम्मदेशनांचा लाभ मिळणार!

श्रीलंकेचे भदंत अतुरलीयरतन थेरो यांच्या हस्ते ३९ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्या उदघाटन

नांदेड – पौष पौर्णिमेच्या मंगल प्रसंगी दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविहार बावरीनगर, दाभड (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथे दिनांक २ व ३ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसीय ३९ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून, आज संध्याकाळी ठीक ७ वाजता धम्म परिषदेचे श्रीलंका येथील मा. खासदार तथा पूजनीय भदंत अतुरलीय रतन थेरो यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था, मुळावा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पूजनीय भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही धम्म परिषद संपन्न होणार आहे.
दि. २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ५:३० ते ६:३० वा त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ, ८:३० वा महाबोधि वंदना, ९:३० वा धम्म ध्वजारोहण व ९:४० पासून धम्म उपदेशास प्रारंभ होईल. दुपारी ठीक २:०० वा. महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत धम्मयान संचलन सायं. ठीक ७.०० वा ३९ व्या अ. भा. बौद्ध धम्म परिषदेच्या उदघाटन समारंभास सुरुवात होईल. त्यानंतर धम्म देसनेस प्रारंभ होईल. परिषदेच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ११.३० दरम्यान वधू – वर परिचय मेळावा व ११.३० वा सामूहिक मंगल परिणय विधी, ११.३० ते १२.३० व्यसन मुक्ती प्रतिज्ञा, १२.३० वा धम्म ज्ञान परीक्षा प्रमाणपत्र वितरण, दुपारी १ पासून रात्री १० वाजेपर्यंत पूजनीय भिक्खु संघातर्फे निरंतर धम्मदेसणा होईल.
या बौद्ध उत्सवामध्ये समाजोपयोगी उपक्रमांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विविध सेवाभावी संस्था व स्वयंसेवकांच्या सहभागातून मोफत वैद्यकीय शिबिरे, शैक्षणिक उपक्रम तसेच अन्नदानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, त्यातून बौद्ध धम्मातील करुणा व परोपकाराचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित होतो.
ही दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उपस्थितांसाठी एक समृद्ध आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार असून, धम्मशिकवणींचा सखोल अभ्यास, आध्यात्मिक उन्नती आणि समविचारी धम्मबांधवांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ही परिषद बौद्ध तत्त्वज्ञानाच्या सार्वकालिक व सार्वत्रिक मूल्यांची जाणीव करून देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या परिषदेकरिता श्रीलंकेतील पूजनीय भदंत अतुरलीय रतन थेरो यांच्यासह भिक्खु वालीवथुरे रतनसार थेरो व अन्य पाच भिक्खू उपस्थित राहणार आहेत. तसेच थायलंड येथून भिक्खु फ्रा येञ्चिन थेरो व भिक्खु लकी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भारतातून पूजनीय भदंत डॉ. खेमधम्मो महाथेरो, भदंत प्रज्ञादीप महाथेरो (महासचिव, अखिल भारतीय भिक्खु संघ, बुद्धगया), भिक्खु ज्ञानदीप महाथेरो (नागपूर), भिक्खु डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, भिक्खु एस. काश्यपायन थेरो (जयसिंगपूर), भिक्खु विनयबोधिप्रिय थेरो, भिक्खु करुणानंद थेरो, भिक्खु महाविरो थेरो (काळेगाव), भिक्खु धम्मानंद थेरो (बिदर), भिक्खु ज्ञानरक्षित (संभाजीनगर), भिक्खु धम्मशील (सारनाथ), भिक्खु बुद्धदत्त (बेंगळूर) आदी देश-विदेशातील विद्वान भिक्खूंच्या धम्मदेशनांचा लाभ उपस्थितांना मिळणार आहे.
या ३९ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेस सर्व उपासक-उपासिकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मदेसनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिषदेचे संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

    आयजी शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाची अवैध व्यवसायांविरुद्ध धडक मोहीम नांदेड : परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने नांदेड आणि परभणी जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध धडक मोहीम राबवली…

    Continue reading
    नांदेडमध्ये विनापरवाना व अवैध वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; एकाच दिवसात २३३ केसेस

    नांदेडमध्ये विनापरवाना व अवैध वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; एकाच दिवसात २३३ केसेस नांदेड शहरात वाढत असलेली वाहतूक कोंडी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

    नांदेडमध्ये विनापरवाना व अवैध वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; एकाच दिवसात २३३ केसेस

    नांदेडमध्ये विनापरवाना व अवैध वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; एकाच दिवसात २३३ केसेस

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त