उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत
नांदेड – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी येथील श्री गुरु गोविंद सिंघजी नांदेड विमानतळावर आगमन झाले.
यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदिप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर आदींनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमरी तालुक्यातील गोरठा येथील नियोजित कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने प्रयाण केले.





