दाभड येथे सामूहिक मंगल परिणय सोहळा संपन्न

दाभड येथे सामूहिक मंगल परिणय सोहळा संपन्न
नांदेड – शांतीदूत प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने 16 वा सामूहिक मंगल परिणय सोहळा रविवार, दि. 11 मे रोजी महाविहार बावरीनगर, दाभड येथे संपन्न झाला. या सोहळ्यात एकूण 15 जोडपे परिणयबद्ध झाले. पू.भ. डॉ.एम. सत्यपाल, अश्वजित थरो, बुद्धभूषण व श्रामणेर संघ यांच्या आशीर्वादाने संपन्न झाला. महाउपासक डॉ. एस.पी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सोहळ्याचे उद्घाटन सुरेशदादा गायकवाड व डीवायएसपी अरविंद रायबोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाले. वधू-वरांचे पालकत्व म्हणून उपा. जी.जी. कोलते व उपा. डी.पी. गायकवाड यांनी सपत्निक पूजा केली.

या सोहळ्यात ऋणानुबंध प्रमुख अतिथी म्हणून सुरेशदादा गायकवाड, आ. बालाजी कल्याणकर, व्ही.आर. भुरे, डॉ. विजयकुमार माहुरे, कांचन सूर्यवंशी, आर.आर. मुनेश्वर, अशोक गायकवाड, गणपत गायकवाड, सरिता गच्चे, धम्मा कदम आदींचा प्रतिष्ठानच्या वतीने शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सचिव उपा. डी.पी. गायकवाड यांनी प्रास्ताविकात नमूद केले की, अनाठायी खर्च, वेळेची बचत व जुन्या रूढी-परंपरेला बाजूला सारून गोरगरीब पाल्यांचा विवाह तसेच हुंडा व देणगीला आळा बसावा, समाजप्रबोधनाबरोबरच पोट जाती तोडून समाज एकत्र जोडण्याची संकल्पना अमलात यावी म्हणून प्रतिष्ठानने ही चळवळ गेल्या 25 वर्षांपासून सुरू केली आहे. समाजातील सर्व स्तरातील समाजबांधव या उपक्रमाला पाठिंबा देत आहेत. या सोहळ्यात एकूण 15 जोडपे विवाहबद्ध झाले असून त्यापैकी 5 जोडपे हे आंतरजातीय आहेत.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन अशोक गोडबोले व सुभाष काटकांबळे यांनी तर आभार प्रा. बी.एम. वाघमारे यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गंगाधर सूर्यवंशी, प्रा. बी.एम. वाघमारे, एस.टी. पंडित, अशोक गोडबोले, सुभाष काटकांबळे, शुद्धोधन मांजरमकर, अ‍ॅड. एम.जी. बादलगावकर, जी.जी. कोलते, एम.पी. गायकवाड, सुरेश व्यवहारे, डी.एन. बोधणे, जनार्दन जमदाडे, उत्तम भंडारे, शिवाजी सोनकांबळे, निलेश जोंधळे, डी.पी. गायकवाड, शिवाजी सावते, बापुराव मस्के, प्रसेनजीत गायकवाड, साहेबराव जमदाडे, अमरदीप बोधणे, अक्षय मांजरमकर, प्रफुल्ल गायकवाड, बुद्धभूषण भंडारे, श्यामसुंदर चिंतेवार, प्रतिक पतंगे, राजू रत्नपारखे, सुहास कंठाळे, ओंकार पार्डे, सचिन डोळस यांनी परिश्रम घेतले.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    Nanded Vruttavedh ​नांदेड – महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (Special Intensive Revision) सुधारित कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोकण, मुंबई आणि राज्यातील इतर काही भागांमध्ये…

    Continue reading
    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    Nanded Vruttavedh नांदेड – ​मुंबई विभागात ठाकूरवाडी ते मंकीहिल स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांच्या सेवेत तात्पुरते बदल केले…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

    मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

    शिक्षणाचा बाजार: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा क्रूर लिलाव

    शिक्षणाचा बाजार: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा क्रूर लिलाव

    आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोला

    आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोला