सकल मराठा समाजाचा नांदेड येथील आक्रोश मोर्चा स्थगित – श्याम पाटील वडजे

सकल मराठा समाजाचा नांदेड येथील आक्रोश मोर्चा स्थगित – श्याम पाटील वडजे
नांदेड – उद्या १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला सकल मराठा समाजाचा नांदेड येथील आक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती मराठा आंदोलक श्याम पाटील वडजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकल मराठा समाजातर्फे मस्साजोगचे सरपंच कै. संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात १८ जानेवारी रोजी भव्य आक्रोश मोर्चा काढला जाणार होता, असे सकल मराठा समाजाच्या ११ जानेवारीच्या बैठकीत ठरले होते. दरम्यान शासनाने आरोपी विरोधात मोक्का लावून आरोपींना पोलीस कोठडीत पाठविले. त्यामुळे उद्या नियोजित असलेला नांदेड येथील आक्रोश मोर्चा तुर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी दिली.
जनमानसात दहशत निर्माण करणाऱ्या मस्साजोग घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे.नांदेडसाठी बीड जिल्ह्यातील मंत्री हे शासनाने पालकमंत्री म्हणून नेमू नयेत. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बीडचे मंत्री नियुक्त करू नयेत, असेही श्याम पाटील वडजे यावेळी म्हणाले.  या पत्रकार परिषदेला दशरथ कपाटे, गोविंद कदम शिर्शीकर, सुनील पाटील कदम, नाना पाटील बेटसांगवीकर, भास्करराव हंबर्डे, सुभाष कोल्हे, दत्ता खराटे , सुधीर देशमुख , नवनाथ जोगदंड , राज सरकार , दत्ता इंगळे, डॉ. बालाजी पेनूरकर व समस्त समाज बांधव उपस्थित होते.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेड जिल्ह्यात दोन दिवस ‘येलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

    नांदेड जिल्ह्यात दोन दिवस ‘येलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता नांदेड : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २० आणि २१ एप्रिल २०२६ या दोन दिवसांसाठी ‘येलो…

    Continue reading
    नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

    नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश नांदेड: नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी विशेष मोहीम हाती…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेड जिल्ह्यात दोन दिवस ‘येलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

    नांदेड जिल्ह्यात दोन दिवस ‘येलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

    नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

    नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी