अतिवृष्‍टी, पुरामुळे बाधित शेतक-यांना मदतीचा हात; नांदेड जिल्ह्यासाठी शासनाकडून ८१२ कोटी रुपयांचा निधी मंजूर 

अतिवृष्‍टी, पुरामुळे बाधित शेतक-यांना मदतीचा हात; नांदेड जिल्ह्यासाठी शासनाकडून ८१२ कोटी रुपयांचा निधी मंजूर

नांदेड – जिल्ह्यातील माहे सप्‍टेबर, 2024 मधील अतिवृष्‍टी व पुरामुळे बाधित शेतक-यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी मंजुर केले आहेत.

नांदेड जिल्‍ह्यात सप्‍टेबर २०२४ या महिन्‍यात अतिवृष्‍टीमुळे पिक नुकसान झालेल्‍या ७ लाख ८३ हजार ९१५ शेतकर्‍यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी ३८ लक्ष इतकी रक्‍कम मंजूर केली आहे. ही रक्‍कम बाधित शेतकरी यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी आता पर्यंत जिल्‍हृयातील ३ लाख ८३ हजार २९७ इतक्‍या शेतकर्‍यांना ४१७ कोटी ५२ लक्ष इतक्‍या रकमेचे वाटप करण्‍यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्‍यात आली आहे.

माहिती भरण्‍यात आलेल्‍या शेतकऱ्याचे संदर्भ क्रंमांक ( व्ही.के. नंबर ) त्‍या त्या गावाच्या तलाठयांना देण्‍यात आले आहेत. ( व्ही.के. नंबर ) या संदर्भ क्रमांकाद्वारे सेतू सुविधा/ आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणा-या शेतकर्‍यांच्या खात्‍यावर थेट मदतीची रक्‍कम जमा होणार आहे. उर्वरीत ४ लक्ष शेतकरी यांची माहिती पुढील २ दिवसात भरण्‍यात येणार आहे.

त्‍यामुळे सप्‍टेबर २०२४ या महिन्‍यात अतिवृष्‍टीमुळे पिक नुकसान झालेल्‍या शेतकऱ्यानी तलाठी कार्यालयात जाऊन आपला संदर्भ क्रमांक घ्‍यावा व ई-केवायसी पूर्ण करुन घ्‍यावी, जेणे करुन त्‍यांच्‍या खात्‍यावर मदतीची रक्‍कम जमा होईल, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन ​लातूर/कवठा: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू, माजी खासदार आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांचे दुःखद…

    Continue reading
    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद नांदेड: शासकीय पोर्टलचा गैरवापर करून हजारो बनावट जन्म नोंदी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा उस्माननगर पोलिसांनी पर्दाफाश केला…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

    गोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न 

    गोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न 

    मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात ‘अबू शूटर’कडून तरुणावर जीवघेणा हल्ला; टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय

    नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात ‘अबू शूटर’कडून तरुणावर जीवघेणा हल्ला; टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय