समाजकल्याण कार्यालयामार्फत संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त रॅली

समाजकल्याण कार्यालयामार्फत संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त संविधान रॅली

शेकडो नागरिकांचे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन

नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्यावतीने 26 नोव्हेंबर रोजी संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त घर-घर संविधान रॅली आयोजित करण्यात आली. शेकडो नागरिकांनी संविधान प्रस्ताविकेचे केलेले सामूहिक वाचन लक्षवेधी ठरले.

यानिमित्ताने नांदेड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, गिरीष कदम  व संजय जाधव उपायुक्त, मनपा, सुप्रीया टवलारे, उपायुक्त मनपा, शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड, सतेंद्र आऊलवार जिल्हा समाज कल्याण अधिकारी, डी.वाय पतंगे ,सहय्यक लेखाधिकारी तसेच अशोक गोडबोले, माधव जमदाडे व भिमराव हटकर, सामाजिक कार्यकर्ते नांदेड यांनी महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृति पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

तद्नंतर मनपाचे अतिरिक्त आयुक्त, गिरीष कदम, समाज कल्याण नांदेडचे सहाय्यक आयुक्त, शिवानंद मिनगीरे यांनी हिरवी झेंडी दाखवून संविधान रॅलीची सुरुवात केली.

सदर संविधान रॅलीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते शिवाजी नगर, कलामंदिर. मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येवून राष्ट्र गीताने संविधान रॅलीची संगाता करण्यात आली.
यावेळी मा.श्री शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना असून जिल्हयातील सर्व नागरिकांनी त्याचा अभ्यास करावा व घटनेने दिलेल्या अधिकारा व कर्तव्य त्यांचे पालन करावे असे मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण नांदेड कार्यालयील अधिकारी कर्मचारी ,जाती पडताळणी कार्यालयील अधिकारी कर्मचारी , जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद नांदेडचे अधिकारी कर्मचारी तसेच इतर मगासव बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी ,कर्मचारी, नांदेड जिल्हयतील विविध्‍ महमंडळचे व्यवस्थापक व कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी, सामजिक कार्यकर्ते तसेच बार्टीचे प्रकल्प अधिकारी व समतादूत यांची उपस्थिती होती.

सदर संविधान रॅलीमध्ये पोलिस अधिक्षक कार्यालीयातील पोलिस बँड पथक ,कर्मचारी बँड पथक संच यांनी देशभक्ती गिते सादर केले तसेच सदर संविधान रॅली मध्ये, नांदेड जिल्हयातील एन.एस.बी महाविद्यालय नांदेड , सायन्स कॉलज नांदेड ,नेहरु युवा केंद्र , विद्यार्थी सहभागी झाले होते व वसंतरावनाईक महाविद्यालय, जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय, सायन्स कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला सदर शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक ,कर्मचारी तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील कर्मचारी हे संविधान अमृत महोत्सव घर-घर संविधान रॅलीत सहभागी झाले होते. तसेच नांदेड जिल्हयातील नागरीकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. सदर रॅलीची सांगता सविंधानाचे प्रस्ताविकाचे सामुहिक वाचन करुन करण्यात आली.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेड महानगरपालिकेचा दुजाभाव: छोट्या जाहिरात व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा, बड्या धेंडांना मात्र अभय!

      नांदेड: छोट्या जाहिरात व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा आणि बड्या धेंडांना मात्र अभय देण्यात येत असल्याचा आरोप शहरातील सर्व छोटे डिझायनर्स, फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायिक आणि होर्डिंग व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनी केला आहे.…

    Continue reading
    गोदावरी नदी पात्रात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

    गोदावरी नदी पात्रात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू नांदेड : शहरातील साठे चौक परिसरातील तीन लहान मुले गोदावरी नदीच्या नगीना घाट येथे पोहण्यासाठी गेली असताना, त्यातील दोन मुलांचा पाण्यात बुडून…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

    मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

    शिक्षणाचा बाजार: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा क्रूर लिलाव

    शिक्षणाचा बाजार: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा क्रूर लिलाव

    आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोला

    आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोला