एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nanded Vruttavedh

​नांदेड – महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (Special Intensive Revision) सुधारित कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोकण, मुंबई आणि राज्यातील इतर काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मतदार नोंदणी व पडताळणीच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक कार्यालयाने मुदत वाढवून देण्याची विनंती भारत निवडणूक आयोगाकडे केली होती. ही विनंती मान्य करत केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ जुलै २०२६ च्या पत्रान्वये नवीन सुधारित वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे.
​या सुधारित कार्यक्रमानुसार, मतदार केंद्रस्तरीय अधिकार्‍यांमार्फत (BLO) केली जाणारी घरोघरी भेट आणि पडताळणीची प्रक्रिया आता ३० जून २०२६ ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पूर्ण केली जाईल. त्यानंतर मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्याचे काम ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत चालणार असून, १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी केली जाईल. नागरिकांना आपल्या हरकती आणि दावे नोंदवण्यासाठी १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे.
​प्राप्त झालेले दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्ण केली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ (सोमवार) रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या सुधारित वेळापत्रकाला विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी द्यावी, तसेच स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांना हे वेळापत्रक लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावे, असे आदेश उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म. रा. परिहर यांनी दिले आहेत.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    Nanded Vruttavedh नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन नांदेड – ​नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे तिथले जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर…

    Continue reading
    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    Nanded Vruttavedh । हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप ​नांदेड – खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह विठ्ठल पावडे, अब्दुल गफार, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, मुन्ना अब्बास…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    भर पावसात हजारोंची उपस्थिती! महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना