नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

​नांदेड: परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दि. १६ ते ३१ मार्च दरम्यान गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरुद्ध व्यापक मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांचा कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांपासून बचाव व्हावा, या सामाजिक उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या पाचव्या दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्या नऊ आरोपींना जेरबंद केले आहे.

या मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर व मुखेड, परभणीतील बोरी, लातूरमधील उदगीर ग्रामीण आणि हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ अशा एकूण पाच पोलीस ठाण्यांनी धडक कारवाया केल्या आहेत. या कारवाईत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अन्वये ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या कारवाई दरम्यान गुटखा आणि इतर साहित्यासह एकूण ८ लाख ४२ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या मोहिमेमध्ये सुगंधी तंबाखू, पान मसाला, मावा आणि गुटख्याच्या अवैध वाहतूक व साठवणुकीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भारतीय न्याय संहिता कलम १२३ अंतर्गत करण्यात येणारी ही कारवाई सत्र न्यायालयात चालणार असून, यामध्ये दोषींना १० वर्षांपर्यंतच्या कारावासासह दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. कडक कायदेशीर तरतुदींमुळे या मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

अवैध व्यवसायांविरुद्धची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर फोन करून किंवा व्हॉट्सॲप मेसेजद्वारे आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    Nanded Vruttavedh नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन नांदेड – ​नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे तिथले जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर…

    Continue reading
    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    Nanded Vruttavedh । हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप ​नांदेड – खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह विठ्ठल पावडे, अब्दुल गफार, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, मुन्ना अब्बास…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    भर पावसात हजारोंची उपस्थिती! महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

    भर पावसात हजारोंची उपस्थिती!  महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक