लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

आयजी शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाची अवैध व्यवसायांविरुद्ध धडक मोहीम

नांदेड : परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने नांदेड आणि परभणी जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेत लोहा शहरात चालणाऱ्या मटका बुकीवर आणि पालम परिसरातील अवैध रेती वाहतुकीवर धाडी टाकून एकूण ११ लाख १० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

दि. १८ मार्च रोजी लोहा शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरातील एका शेडमध्ये ‘कल्याण मटका’ खेळणाऱ्या आणि खेळवून घेणाऱ्या बुकीवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ६२ हजार ६०० रुपयांची रोकड आणि ३ मोबाईल असा एकूण ९६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, या जुगार अड्ड्यात लोहा नगरपरिषदेच्या एका नगरसेवकाचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सी. जी. पांचाळ करत आहेत.

दुसरीकडे पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा प्रकरणी १७ मार्च रोजी कारवाई करण्यात आली. पालम ते पेठपिंपळगांव रोडवर अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा हायवा पोलिसांनी पकडला. या कारवाईत १० लाख १४ हजार रुपये किमतीचा हायवा आणि चार ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अंमलदार शंकर कोलमवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल पथकातील अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन केले आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांचा समावेश होता. तसेच, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी ९१ ५० १०० १०० या ‘खबर’ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, अशी ग्वाही देखील पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

    Nanded Vruttavedh एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन Nanded Vruttavedh नांदेड – येथील बंद पडलेली एन. टी. सी. उस्मानशाही मिल पूर्ववत सुरू करण्यात यावी, या मुख्य…

    Continue reading
    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    Nanded Vruttavedh नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन नांदेड – ​नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे तिथले जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

    एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    भर पावसात हजारोंची उपस्थिती! महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

    भर पावसात हजारोंची उपस्थिती!  महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना