भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड – शहरात चोऱ्या आणि दरोड्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. या मोहिमेअंतर्गत भाग्यनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक गस्त घालत असताना, त्यांना एका गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. तुळसी पार्क, पावडेवाडी येथे वॉचमन म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने दरोडा टाकला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचला. संशयावरून संतोष तुकाराम शेळके याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आपल्या पाच साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
या प्रकरणात पोलिसांनी एकूण ६ आरोपींना अटक केली असून, त्यांचे वय १९ ते २२ वर्षांच्या दरम्यान आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुनिल सुधाकर गच्चे, संतोष तुकाराम शेळके, प्रतिष प्रशांत गजभारे, उरुवेल राहुल सावंत, सोहम अशोक गायकवाड आणि हर्ष जगदीश कोकरे यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी नांदेडमधील आंबेडकरनगर, श्रावस्तीनगर आणि वसरणी भागातील रहिवासी आहेत. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या कारवाईदरम्यान आरोपींकडून एकूण ३ लाख ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गुन्ह्यात वापरलेली तलवार, लोखंडी रॉड, दोन मोटार सायकली, २० हजार रुपये रोख आणि १० हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन यांचा समावेश आहे. हा सर्व मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी दरोड्याचा हा मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलिसांच्या या तत्परतेचे स्वागत केले आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. भाग्यनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तांबे, महेश माळी आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख यांच्यासह विशाल माळवे, गजानन किडे, विष्णूकांत मुंडे व इतर अंमलदारांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    सुरेश गायकवाड यांचा ६९ वा वाढदिवस नांदेडमध्ये उत्साहात साजरा; ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – गायकवाड यांचे आवाहन Nanded Vruttavedh । ​नांदेड – आंबेडकरवादी लोक मंचच्या वतीने काँग्रेसच्या अनुसूचित जाती…

    Continue reading
    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    Nanded Vruttavedh ​नांदेड – महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (Special Intensive Revision) सुधारित कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोकण, मुंबई आणि राज्यातील इतर काही भागांमध्ये…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    भर पावसात हजारोंची उपस्थिती! महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

    भर पावसात हजारोंची उपस्थिती!  महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

    मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

    मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला