इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड – राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) मार्फत इस्रायलमध्ये नुतनीकरणा अंतर्गत कामासाठी कौशल्यपूर्ण भारतीय उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या निवड प्रक्रियेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त बा.सु.मरे यांनी केले आहे.

इच्छुक उमेदवारांसाठी पात्रता, निकष, निवड प्रक्रिया, लाभ याबाबतची सर्व माहिती पुढीलप्रमाणे आहे.

पात्रता निकष

किमान अनुभव :- ३ वर्षे (Renovation Interior Work मध्ये कौशल्य आवश्यक).

शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण असावा. वयमर्यादा २५ ते ५० वर्षे. इंग्रजी ज्ञान वाचन, लेखन आणि बोलणे यामध्ये प्राविण्य. पूर्वअनुभव इस्त्रायलमध्ये पूर्वी नोकरी नसावी. गुन्हेगारी रेकॉर्ड भारतातून स्वच्छ PCC आवश्यक, व्यसन मुक्त इतिहास. आरोग्य शारीरिक व मानसिक दृष्ट्यासक्षम मोठे आजार नसावेत. पासपोर्ट किमान ३ वर्षे वैध. भारतीय नागरिकत्व आवश्यक. कुटुंबीय इस्त्रायलमध्ये नातेवाईक नसावेत.

एकूणपदे : २६००

1.Plastering Work – १००० पदे

२. Ceramic Tiling १००० पदे

३. Drywall Worker – ३०० पदे

४. Mason ३०० पदे

निवड व स्क्रीनिंग प्रक्रिया

राज्य सरकार प्राथमिक छाननी करून उमेदवारांची माहिती NSDC कडे पाठवेल. इंग्रजी, पात्रता, अनुभव व डोमेन ज्ञान तपासून उमेदवारांची पहिली स्क्रीनिंग होईल. वैध पासपोर्ट अनिवार्य. NSDC निवडलेल्या उमेदवारांची माहिती इस्त्रायल टीमकडे पाठवेल.

इस्त्रायल टीम यांच्या नाव तपासणीनंतर निवडलेल्यांना प्रोफेशन लटेस्ट द्यावी लागेल. वैद्यकीय चाचणी व त्याचा खर्च उमेदवाराने करावा. पार्श्वभूमी पडताळणी गुन्हेगारीत पासणीसह खर्च उमेदवाराचा.व्हिसा विमान तिकिटे उमेदवाराने मार्केट रिटन घेणे आवश्यक.प्रशिक्षण व प्री-डिपार्चरओरिएंटेशन NSDC अंतर्गत अनिवार्य.

वेतन व सुविधा

किमान वेतन : 6,247.67 NIS (सुमारे INR 1,62,500 प्रति महिना)

ड्युटी तासः प्रतिमहिना १८२ तास, कामाचे दिवस प्रति महिना २१-२६ दिवस, ओव्हर टाईम कंपनी नियमांनुसार, निवास नियोक्त्याकडून (Accommodation Allowance पगारातून कपात) वैद्यकीय विमा नियोक्त्याकडून (चार्ज पगारातून कपात), नोकरीची जागा इस्त्रायलमध्ये कुठेही करार कालावधी पहिला व्हिसावर्ष अखेरीपर्यंत वैधनंतर १-१ वर्ष वाढवून कमाल ६३ महिने PCC आवश्यक होय इंटरव्यू प्रत्यक्ष (Face-to-Face)

उमेदवाराचे खर्च (Candidate Expenses)

पासपोर्टफी (आवश्यक असल्यास), वैद्यकीय चाचणी खर्च PCC, व्हिसाफी (लागू असल्यास) फ्लाइट तिकिटे (सुस्ताव्यासाठी + परतीच्या) NSDC नोंदणी व प्रोसेसिंग फी 10 हजार रुपये + जीएस.

निवड व अपात्रतेचे निर्णय फक्त इस्त्रायल एम्प्लॉयर घेतील. NSDC हा एकमेव अधिकृत फॅसिलिटेटर आहे. लाल, एजंट किंवा कोणत्याही अनधिकृत व्यक्तींशी संपर्क करू नये. सर्व आवश्यक माहिती व अर्ज करण्यासाठीची लिंक लवकरच https://maharashtrainternational.com या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येणार आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    Nanded Vruttavedh । हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप ​नांदेड – खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह विठ्ठल पावडे, अब्दुल गफार, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, मुन्ना अब्बास…

    Continue reading
    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    नांदेडमध्ये अवैध गावठी पिस्तुलांची विक्री करणारी टोळी गजाआड; ४ पिस्तुले व १३ जिवंत काडतुसांसह १.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त ​नांदेड जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    भर पावसात हजारोंची उपस्थिती! महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

    भर पावसात हजारोंची उपस्थिती!  महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक