नांदेडात राज्यस्तरीय युवा महोत्सवाची जय्यत तयारी

नांदेडात राज्यस्तरीय युवा महोत्सवाची
जय्यत तयारी

नांदेड- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड व राष्ट्रीय सेवा योजना, स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व नेहरु युवा केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर युवा महोत्सव सन 2024-25 चे आयोजन 12 ते 14 डिसेंबर,2024 या कालावधीत कुसुम सभागृह, व्ही.आय.पी.रोड, नांदेड या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

​युवा महोत्सव म्हणजे युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकारमार्फत आयोजन करण्यात येते.

सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन 12 ते 16 जानेवारी,2025 या कालावधीत दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय युवा महोत्‍सव- विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग (Viksit Bharat Young Leaders Dilogue ) –
​युवांच्या भारत निर्माणासाठी नवीन संकल्पना विचारात घेवून युवांना राष्ट्र निर्माणमध्ये सहभागी करुन त्यांची दुरदृष्टीता विचारात घेणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग अंतर्गत पुढीलप्रमाणे संकल्पना संदर्भांकित पत्राद्वारे निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
1) Tech for Viksit Bharat, 2) Vikas Bhi Virasat Bhi, 3) Empowering Youth for Viksit Bharat, 4) Making India the Vishwaguru, 5) Making India the Startup capital of the World, 6) FIT India- A means to Viksit Bharat, 7) Making India the Global Manufacturing Powerhouse, 8) Making India Energy Efficient, 9) Building the Infrastructure for the Future, 10) Empowering Women and Improving Social Indicators
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांचे निर्देशान्वये राष्ट्रीय युवा महोत्सव- विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग (Viksit Bharat Young Leaders Dilogue ) या अंतर्गत ऑनलाईन स्पर्धा प्रथम टप्पा- Viksit bharat Quiz, द्वितीय टप्पा – निबंध लेखन स्पर्धा (Essays), तृतिय टप्पा- Viksit Bharat PPT Challenge या स्पर्धेबाबत मुदत वाढविण्यात आलेली असून सुचना/ निर्देश पुढीलप्रमाणे आहेत.
ऑनलाईन स्पर्धा प्रथम टप्पा- Viksit Bharat Quiz सहभाग नोंदविणेसाठी 10 डिसेंबर,2024 पर्यंत मुदत वाढविण्यात आलेली आहे. द्वितीय टप्पा- निबंध लेखन स्पर्धा ऑन लाईन पध्दतीने 12 डिसेंबर,2024 पर्यं माय भारत पोर्टलवर (my bharat portal) अपलोड करता येतील. या स्पर्धेसाठी केंद्र शासन युवक कार्यक्रम मंत्रालय यांचे ऑनलाईन पध्दतीने प्राप्त होणा-या निबंधाची छाननी विषयानरुप करण्यात येणार आहे. त्यांचेकडून प्रथम टप्यात 12/12/2024 रोजी छाननी केलेले निबंध राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच यामधील दुस-या टप्यामध्ये 17/12/2024 रोजी छाननी केलेले निबंध पाठविण्यात येणार आहेत. याचा निकाल 20/12/2024 पर्यंत घोषित करण्यात येईल.

​या राज्यस्तर युवा महोत्सवमधुन महाराष्ट्र राज्याचा संघ राष्ट्रीय युवा महोत्सवकरीता निवडण्यात येणार आहे. त्याकरीता नांदेड जिल्हयातील जास्तीत-जास्त युवक-युवतींनी व नांदेडकरांनी मोठया संख्येन उपस्थित राहुन या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नारायणा स्कूलचा असंवेदनशील कारभार; ४२ अंश तापमानात विद्यार्थ्यांना भर उन्हात जेवण्यास पाडले भाग

    नांदेड: उन्हाची तीव्रता वाढल्याने एकीकडे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचे आदेश नुकतेच जारी केले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत, शहरातील डी-मार्ट परिसरातील…

    Continue reading
    नांदेड शहरात मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धरपकड

    नांदेड शहरात मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धरपकड ​नांदेड : शहरात चोरी आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ राबविण्यात येत आहे. या…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नारायणा स्कूलचा असंवेदनशील कारभार; ४२ अंश तापमानात विद्यार्थ्यांना भर उन्हात जेवण्यास पाडले भाग

    नारायणा स्कूलचा असंवेदनशील कारभार; ४२ अंश तापमानात विद्यार्थ्यांना भर उन्हात जेवण्यास पाडले भाग

    नांदेड शहरात मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धरपकड

    नांदेड शहरात मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धरपकड

    नांदेड जिल्ह्यात दोन दिवस ‘येलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

    नांदेड जिल्ह्यात दोन दिवस ‘येलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

    नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

    नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम