लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

वडेपुरी शिवारात माता रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी बिबट्याचे दर्शन; व्यापारी अतुल सेन यांनी काढले व्हिडिओ, परिसरात दवंडी

​​सोनखेड/वडेपुरी :
लोहा तालुक्यातील ​सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडेपुरी शिवारात आज सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वडेपुरी शिवारातील माता रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी पर्ण हॉटेलजवळ हा बिबट्या दिसून आला असून, व्यापारी अतुल सेन नामक व्यक्तीने सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलमध्ये या बिबट्याचे दोन व्हिडिओ चित्रित केले आहेत.
​बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वन विभाग आणि सोनखेड पोलिसांनी तातडीने कार्यवाही केली. परिसरातील संभाव्य धोका लक्षात घेऊन वन विभाग तसेच आसपासच्या सर्व गावातील पोलीस पाटील यांना तत्काळ सूचना देण्यात आल्या. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गावांमध्ये दवंडी देऊन ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे अद्याप पावेतो कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
​वन विभागाने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी शेतात किंवा घराबाहेर एकटे न फिरण्याचे आणि पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेड : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अर्धापूर पोलीस…

    Continue reading
    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम नांदेड – प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा तसेच अनियमित…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त