नांदेडमध्ये अमित शाह यांची ‘शंखनाद’ भव्य जाहीर सभा; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची भाजपकडून जोरदार तयारी

भाजपच्या पत्रकार परिषदेत खा. अशोक चव्हाण यांची घोषणा

फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाण देखील संबोधित करणार

जाहीर सभेसाठी विशाल वॉटरप्रुफ मंडप, हजारोंची गर्दी अपेक्षित

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण*

नांदेड – केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह येत्या सोमवारी २६ मे रोजी दुपारी २ वाजता नवा मोंढा, नांदेड येथे भारतीय जनता पक्षाच्या ‘शंखनाद’ भव्य जाहीर सभेला संबोधित करणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी नेते सुद्धा मार्गदर्शन करणार असल्याची माहिती खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

अमित शाह यांच्या नांदेड दौऱ्याची माहिती देण्यासाठी नांदेड जिल्हा भाजपच्या वतीने आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले की, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री २५ ते २७ मे दरम्यान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नवा मोंढा, नांदेड येथे दुपारी २ वाजता आयोजित ‘शंखनाद’ भव्य जाहीर सभा हा त्यांच्या दौऱ्याचा मुख्य कार्यक्रम असून, यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खा.डॉ. भागवत कराड, पालकमंत्री अतुल सावे, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह अनेक आमदार व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहतील. नांदेड जिल्ह्यातील पावसाचे वातावरण लक्षात घेता या सभेसाठी विशाल वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. वेळेवर पाऊस आला तरीही सुरळीतपणे मोठी सभा होईल, असा विश्वास व्यक्त करून खा. चव्हाण यांनी नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सोमवारी २६ मे रोजी साधारणतः दुपारी १.१५ वाजता नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी १.३० वाजता वसंतराव नाईक चौक, नांदेड येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. हा पुतळा नांदेड-वाघाळा शहर महानगर पालिकेने उभारला आहे. दुपारी १.४५ वाजता भाग्यनगर रोड, विद्युत नगर चौक येथे राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता नाना-नानी पार्क समोर उभारण्यात आलेल्या भाजप महानगर कार्यालयाचे उद्घाटन अमित शाह व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. भाजपचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. त्याच रात्री केंद्रीय गृहमंत्री विमानाने मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी पुढे दिली.

पत्रकार परिषदेला खा.डॉ. अजित गोपछडे, भाजपचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, दक्षिण ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, विजय गंभीरे उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे संचालन जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले.

सैन्य गौरव, खंबीर नेतृत्व, विकसित भारत आणि भाजपच्या निवडणूक सज्जतेचा ‘शंखनाद’!

नवा मोंढा, नांदेड येथील सभेतून ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत शेकडो दहशतवादी व त्यांच्या तळांचा खात्मा करणाऱ्या भारतीय सैन्याच्या गौरवाचा शंखनाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवरच्या ११ वर्षांच्या वाटचालीत २०४७ मधील विकसित भारताची भक्कम पायाभरणी केल्याचा शंखनाद, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या खंबीर नेतृत्वाखाली नक्षलवाद निर्मूलनाबाबत कटिबद्धतेचा शंखनाद आणि महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपच्या सज्जतेचा शंखनाद होणार असल्याने या सभेला ‘शंखनाद’ हे नाव देण्यात आल्याचे खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. सुरेश सावंत यांचा पालकमंत्री अतुल सावे व खा. अशोक चव्हाणांनी केला सत्कार

    साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. सुरेश सावंत यांचा पालकमंत्री अतुल सावे व खा. अशोक चव्हाणांनी केला सत्कार नांदेड – ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला साहित्य…

    Continue reading
    पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक

    पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक नांदेड – जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, शुक्रवार २० जून २०२५ रोजी नांदेड येथे जिल्हा नियोजन समितीची…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. सुरेश सावंत यांचा पालकमंत्री अतुल सावे व खा. अशोक चव्हाणांनी केला सत्कार

    साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. सुरेश सावंत यांचा पालकमंत्री अतुल सावे व खा. अशोक चव्हाणांनी केला सत्कार

    पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक

    पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक

    नांदेडमध्ये बेफाम होर्डिंगचा धोका वाढला: मुथा चौकात होर्डिंग कोसळले, प्रशासन गप्प का?

    नांदेडमध्ये बेफाम होर्डिंगचा धोका वाढला: मुथा चौकात होर्डिंग कोसळले, प्रशासन गप्प का?

    अल्पसंख्याक व एस.सी. एस.एसटी वस्त्यांची तोडफोड रोखा, अन्यथा संभाव्य उद्रेकास प्रशासन जबाबदार – वंचितचा इशारा

    अल्पसंख्याक व एस.सी. एस.एसटी वस्त्यांची तोडफोड रोखा, अन्यथा संभाव्य उद्रेकास प्रशासन जबाबदार – वंचितचा इशारा

    विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार बायोमेट्रीक अद्ययावत करुन घ्यावे -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

    विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार बायोमेट्रीक अद्ययावत करुन घ्यावे -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

    “जीबीएस” या दुर्मिळ आजारानेग्रस्त तरुण उपचारानंतर पूर्णपणे बरा; नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची किमया 

    “जीबीएस” या दुर्मिळ आजारानेग्रस्त तरुण उपचारानंतर पूर्णपणे बरा; नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची किमया