विधानसभेसाठी आज 21 उमेदवारांचे अर्ज दाखल; लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण तीन अर्ज

विधानसभेसाठी आज 21 उमेदवारांचे अर्ज दाखल; लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण तीन अर्ज

नांदेड – विधानसभा निवडणुकीसाठी आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्यच्या तिसऱ्या दिवशी 18 उमेदवारांनी 20 अर्ज 9 मतदारसंघात दाखल केले आहेत. त्यामुळे 24 ऑक्टोबर पर्यंत 21 उमेदवारांचे 24 अर्ज दाखल झाले आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी आणखी दोन अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत एकूण 3 अर्ज दाखल झाले आहेत.

आज राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षाचे तसेच सध्याच्या विधानसभा व विधानपरिषद सदस्य असलेल्यांपैकी 83-किनवट मतदारसंघात एका उमेदवाराने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. आतापर्यंत दोन उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भाजपचे आमदार भिमराव रामजी केराम (एबी फॉर्म अप्राप्त) यांचा समावेश आहे. 84-हदगावमध्ये आज कॉग्रेसचे आमदार माधव निवृत्तीराव पवार यांनी अर्ज दाखल केला. 88-लोहा मतदारसंघात आज माजी खासदार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांनी अर्ज दाखल केला. 89-नायगाव येथे भाजपचे आमदार राजेश संभाजीराव पवार यांनी अर्ज दाखल केला. 91-मुखेड येथे कॉग्रेसचे पाटील हनमंतराव व्यंकटराव (एबी फॉर्म अप्राप्त), भाजपचे आमदार तुषार गोविंदराव राठोड (एबी फॉर्म अप्राप्त), शिवसेना उबाठाचे दशरथ मंगाजी लोहबंदे (एबी फॉर्म अप्राप्त) यांनी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय अपक्ष म्हणून भास्कर बालाजी हंबर्डे, संजय शिवाजीराव भोगरे, नय्यर जहा मोहमंद फेरोज हुसेन यांनी 87-नांदेड दक्षिण मधून तर लोहामधून अपक्ष मनोहर बाबाराव धोंडे यांनी अर्ज दाखल केला.

आज दिवसभरात किनवटमधून 14, हदगावमधून 28, भोकरमधून 56, नांदेड उत्तरमध्ये 30, नांदेड दक्षिणमध्ये 18, लोहामध्ये 8, नायगावमध्ये 20, देगलूरमध्ये 37, मुखेडमध्ये 33 असे एकूण 240 अर्ज इच्छूकांनी प्राप्त केले आहेत. आतापर्यंत 1 हजार 68 अर्ज इच्छुकांनी प्राप्त केले आहेत.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज ज्ञानेश्वर बाबूराव कोंडामंगले व रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी अर्ज दाखल केले आहेत. याठिकाणी एकुण 3 अर्ज दाखल झाले आहेत.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    एकाही मताचा फरक नाही ; नांदेड लोकसभा,विधानसभेच्या ७५ केंद्रावर EVM व VVPAT पडताळणी

    EVM व VVPAT एकाही मताचा फरक नाही ; नांदेड लोकसभा,विधानसभेच्या ७५ केंद्रावर VVPAT पडताळणी आयोगाच्या सूचनेप्रमाणे नियमित प्रक्रिया पूर्ण नांदेड – मतमोजणी प्रक्रिये दरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे प्रत्येक विधानसभा…

    Continue reading
    बॅलेट पेपरवर मतदान घ्या; नांदेड शहरात काँग्रेस पक्षांच्या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात

    नांदेड शहरात काँग्रेस पक्षांच्या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात गांधी पुतळ्याजवळील कार्यक्रमात शहरातील १ हजार नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद नांदेड – मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने ५ डिसेंबर रोजी…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

    एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    भर पावसात हजारोंची उपस्थिती! महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

    भर पावसात हजारोंची उपस्थिती!  महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना