राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड

नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रह्मे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नरेंद्र के.ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, दिवाणी व फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, एन.आय.अॅक्टची प्रकरणे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका वाद पुर्व मालमत्ता कराची प्रकरणे, गुन्हा कबुलीची प्रकरणे, आर.टी.ओ. व रेल्वे पोलीस विभागाची प्रकरणे, कौटुंबिक, कामगार, सहकार, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच प्रकरणे, सर्व बॅंक प्रकरणे, फायनान्स कंपनीची प्रकरणे, पंचायत समिती कर वसुली व दाखलपुर्व प्रकरणे, बि.एस.एन.एल. कंपनी प्रकरणे, एम.एस.ई.डी.सी.एल. कंपनी ईत्यादी प्रकरणे ठेवण्यात आली होती त्या करीता जिल्ह्यात एकुण 33 पॅनल तयार करण्यात आले होते.

दिनांक 14 मार्च रोजी झालेल्या लोक न्यायालयात नांदेड जिल्ह्यातील न्यायालयातील प्रलंबित एकूण 12 हजार 629 प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 1 हजार 135 प्रकरणे निकाली व जवळपास 29 कोटी 81 लाख 84 हजार 502 रुपयांचे तडजोड मुल्य होते. मालमत्ता थकबाकी व पाणीपट्टीची 4 हजार 528 प्रकरणे निकाली निघाली व 4 कोटी 56 लाख 38 हजार 383 रूपयांचे तडजोड मुल्य होते. असे एकूण 6 हजार 199 प्रकरणे निकाली निघाली आणि तडजोड मुल्य 38 कोटी 04 लाख 60 हजार 759 रूपये एवढे आहे.

विषेश म्हणजे 14 कोटींचे मुख्य दिवाणी प्रकरण आणि एम.ए.सी.टी.चे 103 प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदातीमध्ये निकाली निघाली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी राष्ट्रीय लोकअदालतीसाठी सहभागी झालेल्या सर्व पक्षकार, न्यायाधीश वर्ग, कर्मचारी वर्ग त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेड : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अर्धापूर पोलीस…

    Continue reading
    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम नांदेड – प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा तसेच अनियमित…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त