नांदेडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या

नांदेडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या

नांदेड: ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत मुख्य आरोपीला १२ तासांच्या आत अटक करण्यात यश मिळवले आहे.

दिनांक ७ फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजता वडगाव येथे पवन मानिका पुयड याच्यासह इतर पाच-सहा जणांच्या टोळीने मयत पवन पुयड याच्याशी जुन्या वादातून हुज्जत घातली होती. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून मयताला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली, तसेच खंजरने छातीवर आणि गळ्याखाली गंभीर वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे आणि नागनाथ तुकडे यांची दोन विशेष पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती. शोध मोहिमेदरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी पवन माणिका पुयड हा शंकरराव चव्हाण चौकातील ओव्हर ब्रिजखाली थांबलेला असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला पुढील तपासासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेड : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अर्धापूर पोलीस…

    Continue reading
    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम नांदेड – प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा तसेच अनियमित…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त