नायगाव पोलिसांची मोठी कारवाई: तलवीड शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा, १२ जणांना अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
नायगाव -नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करत असताना, २५ डिसेंबर २०२५ रोजी नायगाव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजे तलवीड शिवारात काही व्यक्ती ‘अंदर-बाहर’ नावाचा जुगार खेळत आणि खेळवत आहेत. माहितीची खात्री पटल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक विशेष पथक तयार करून संबंधित ठिकाणी धाड टाकण्यात आली.
पोलीस पथकाने तलवीड शिवारात छापा टाकला असता, तिथे १. शेख खादीर दस्तगीर राहणार घुंगराळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड २. गणपती गोविंदराव जाधव वय २९ वर्ष राहणार सुगाव तालुका नायगाव ३. भगवान गणपती ढगे वय ३५ वर्ष राहणार सावरखेड तालुका नायगाव ४. माधव कोंडीबा सुगावे वय ४० वर्षे राहणार घुमराळा तालुका नायगाव ५. साईनाथ बाबू गायकवाड राहणार सावरखेड तालुका नायगाव ६. माणिका बळी वानखेडे वय ४८ वर्षे राहणार सावरखेड तालुका नायगाव ७. अविनाश प्रकाश माचनवाढ वय ३२ वर्ष राहणार हंगेरगा तालुका उमरी ८. शंकर गणपती देवडे राहणार भाजी मार्केट इतवारा नांदेड ९. हनुमंत गंगाधर वानखेडे वय 38 वर्षे राहणार सावरखेड तालुका नायगाव १०. नागोराव आनंदा गायकवाड राहणार सावरखेड तालुका नायगाव ११. संजय शंकर बाणेवाडी राहणार घुंगराळा तालुका नायगाव १२. गणेश बालाजी पवळे राहणार कोपरा तालुका नायगाव जिल्हा नांदेड, हे बारा इसम बेकायदेशीररीत्या जुगार खेळताना रंगेहात पकडले गेले. पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून नगदी १ लाख ०८ हजार ८०० रुपये व ०९ मोवाईल फोन, ०५ मोटार सायकल व जुगाराचे साहित्य असा एकूण ६ लाख ११ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला आहे. याप्रकरणी सर्व बारा आरोपींविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. अत्यंत धाडसाने आणि नियोजित पद्धतीने ही कारवाई करणाऱ्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी विशेष कौतुक केले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल संपूर्ण पथकाचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.





