आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन
नांदेड: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निलंगेकर यांच्या पत्नी उपासिका यशोदाबाई निलंगेकर यांचे आज, दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दुःखद निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात चार मुलं आणि तीन मुली असा मोठा परिवार आहे. त्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते श्याम निलंगेकर, पत्रकार विजय निलंगेकर, मनपातील सेवानिवृत्त कर्मचारी आनंद निलंगेकर आणि ॲड. अजय निलंगेकर यांच्या मातोश्री होत.
दिवंगत यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांची अंत्ययात्रा उद्या, दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या लालवाडी येथील निवासस्थानाहून निघेल आणि शांतीधाम गोवर्धन घाट येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.





