हवामान विभागाचा नांदेड जिल्ह्यासाठी ‘येलो’ अलर्ट: मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांनी काळजी घ्यावी

हवामान विभागाचा नांदेड जिल्ह्यासाठी ‘येलो’ अलर्ट: मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांनी काळजी घ्यावी

नांदेड -प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबईने दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ११ ते १५ सप्टेंबर २०२५ या पाच दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे. या काळात जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वादळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रति तास असू शकतो. त्याचप्रमाणे, ११, १३, १४ आणि १५ सप्टेंबर २०२५ रोजी तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आणि सर्व संबंधित यंत्रणांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
या हवामानामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी खालील गोष्टींचे पालन करावे.
काय करावे?
* विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता असल्यास घराबाहेर पडणे टाळा.
* मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास सुरक्षित इमारत नसेल, तर लगेच सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
* घराबाहेर असताना आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत किंवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
* घरातील विद्युत उपकरणे चालू असल्यास, ती त्वरित बंद करा.
* तारांचे कुंपण, विजेचे खांब आणि इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहा.
* पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
काय करू नये?
* विजा चमकत असताना लँडलाईन फोनचा वापर करू नका. तसेच शॉवरखाली आंघोळ करू नका.
* घरातील बेसिनचे नळ आणि पाण्याच्या पाईपलाइनला स्पर्श करू नका.
* लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
* उंच झाडाच्या खाली उभे राहू नका.
* धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ थांबणे टाळा.
* घरात असताना उघड्या दरवाजातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
या सूचनांचे पालन करून नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड ​लोहा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी;  गुन्हा दाखल होताच 3 दिवसांत आरोपीला अटक लोहा – ​तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथे शेतीच्या…

    Continue reading
    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन नांदेड: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निलंगेकर यांच्या पत्नी उपासिका यशोदाबाई निलंगेकर यांचे आज, दिनांक १२…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत