नांदेड शहरात अनधिकृत होर्डिंगप्रकरणी हॉटेल मालकासह जाहिरातदारावर गुन्हा दाखल

नांदेड शहरात अनधिकृत होर्डिंगप्रकरणी हॉटेल मालकासह जाहिरातदारावर गुन्हा दाखल

​नांदेड – शहरातील शिवाजी नगर भागात महानगरपालिकेने अनधिकृत जाहिरात होर्डिंग्जविरोधात धडक कारवाई केली आहे. ‘द टेबल फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट’चे चालक व मालक, तसेच बॅनर तयार करणारे आणि ते लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात विनापरवानगी फलक लावून विद्रुपीकरण केल्याचा ठपका ठेवत मनपा प्रशासनाने ही कठोर पावले उचलली आहेत.
​नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने शहरात जाहिरात फलकांसाठी एकूण ११८ ठिकाणे निश्चित केली असून, तिथे ठराविक आकाराच्या फ्रेमही बसवल्या आहेत. निर्धारित शुल्क भरून या ठिकाणी कायदेशीररीत्या तात्पुरती जाहिरात लावण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र, संबंधित हॉटेल चालकांनी नियमांचे उल्लंघन करून विनापरवानगी फलक लावल्याचे २२ डिसेंबर रोजी निदर्शनास आले. यामुळे ‘महाराष्ट्र विद्रुपन प्रतिबंधक कायदा १९९५’ च्या कलम ३ नुसार पोलीस ठाण्यात FIR (क्र. ०४४९/२०२५) नोंदवण्यात आला आहे.
​ही कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपआयुक्त अजितपालसिंघ संधु यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी रमेश चवरे, इमारत निरीक्षक भरत शिवपुरे व अतिक्रमण पथकाने ही मोहीम राबवली. आचारसंहिता काळात नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी अनधिकृत फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रह्मे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष…

    Continue reading
    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    नांदेड शहरात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव; निधी व जागा संपादन करण्याबाबत सभेत घेतला जाणार निर्णय नांदेड: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा सोमवार,…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद