नांदेड जिल्ह्यासाठी 20 व 21 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी; नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा

नांदेड जिल्ह्यासाठी 20 व 21 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी; नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा 

नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 20 ऑक्टोबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज 20 व 21 ऑक्टोबर 2025 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 20 व 21 ऑक्टोबर 2025 या दोन्ही दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या गोष्टी करा :
1) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
2) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
3) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
4) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.
5) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका:
1) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
2) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
3) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
4) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
5) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन ​लातूर/कवठा: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू, माजी खासदार आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांचे दुःखद…

    Continue reading
    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद नांदेड: शासकीय पोर्टलचा गैरवापर करून हजारो बनावट जन्म नोंदी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा उस्माननगर पोलिसांनी पर्दाफाश केला…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

    गोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न 

    गोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न 

    मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात ‘अबू शूटर’कडून तरुणावर जीवघेणा हल्ला; टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय

    नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात ‘अबू शूटर’कडून तरुणावर जीवघेणा हल्ला; टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय