महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे २८ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त भागाची पाहणी, आढावा बैठक व महाआरोग्य शिबिरास उपस्थिती

नांदेड  – राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळग्रस्त भागातील पीक पाहणी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर कंधार तालुक्यातील शिराढोण येथे आयोजित महाआरोग्य शिबिरास उपस्थित राहणार आहेत.
महसूल मंत्री बावनकुळे हे दुपारी १२ वाजता हिंगोली येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी २ वाजता नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील पीक पाहणी दौऱ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी ३ ते ४ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीस उपस्थित राहतील.
दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून ते कंधार तालुक्यातील शिराढोण येथील कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण करतील. दुपारी ४.३० वाजता प्रेरणास्थळ भीमाशंकर विद्यालय परिसर येथे लोकनेते कै. माधवराव पांडागळे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.
सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमस्थळावरून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करून सायंकाळी ५.४५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी ६.४५ वाजता विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव जोंधळे यांचे निधन

    सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव जोंधळे यांचे निधन Nanded Vruttavedh नांदेड – इतवारा, मोहम्मद अली रोड, नांदेड येथील ज्येष्ठ उपासक व सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव श्रीधरराव जोंधळे (वय ७३ वर्ष) यांचे…

    Continue reading
    महापालिकेच्या कोट्यवधींच्या खर्चानंतरही सुरक्षेचा बोजवारा: डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे!

    महापालिकेच्या कोट्यवधींच्या खर्चानंतरही सुरक्षेचा बोजवारा: डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे! Nanded Vruttavedh नांदेड – महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सुसज्ज करण्यात आलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव जोंधळे यांचे निधन

    सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव जोंधळे यांचे निधन

    महापालिकेच्या कोट्यवधींच्या खर्चानंतरही सुरक्षेचा बोजवारा: डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे!

    महापालिकेच्या कोट्यवधींच्या खर्चानंतरही सुरक्षेचा बोजवारा: डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे!

    नांदेड शहरात ब्राऊन शुगरची विक्री, श्रीनगर, विवेकनगरातून दोघे अटकेत; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    नांदेड शहरात ब्राऊन शुगरची विक्री,  श्रीनगर, विवेकनगरातून दोघे अटकेत; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    मान्सून आला तसा परत गेला, तरीही नांदेड जिल्ह्यात पाऊस? १७ व १८ रोजी येलो अलर्ट!

    मान्सून आला तसा परत गेला, तरीही नांदेड जिल्ह्यात पाऊस?  १७ व १८ रोजी येलो अलर्ट!

    नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा धडाका; नांदेड ग्रामीण, विमानतळ, अर्धापूर, मुदखेडसह ६ अधिकाऱ्यांची खांदेपालट

    नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा धडाका; नांदेड ग्रामीण, विमानतळ, अर्धापूर, मुदखेडसह ६ अधिकाऱ्यांची खांदेपालट

    सुप्रसिद्ध नाट्यलेखक डॉ. विलासराज भद्रे यांचे निधन

    सुप्रसिद्ध नाट्यलेखक डॉ. विलासराज भद्रे यांचे निधन