सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव जोंधळे यांचे निधन
Nanded Vruttavedh
नांदेड – इतवारा, मोहम्मद अली रोड, नांदेड येथील ज्येष्ठ उपासक व सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव श्रीधरराव जोंधळे (वय ७३ वर्ष) यांचे गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे नांदेड परिसरातील आंबेडकरी चळवळीसह सामाजिक व प्रशासकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २:०० वाजता रामघाट (जुना मोंढा, नांदेड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी अंतयात्रा त्यांच्या राहत्या घरातून, मोहम्मद अली रोड येथून निघेल.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. आंबेडकरी चळवळीतील युवा नेते प्रीतम कुमार जोंधळे यांचे ते वडील होत.





