नांदेड शहरात मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धरपकड

नांदेड शहरात मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धरपकड

​नांदेड : शहरात चोरी आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या १० दिवसांत १२५ पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून, ऑन रेकॉर्ड असलेल्या अनेक आरोपींची कसून तपासणी आणि राउंडिंग अप सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री 11 वाजेपासून बुधवारी पहाटे 3 वाजेपर्यंत शहरात विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची मोठी झाडाझडती घेण्यात आली.
​या मोहिमेमध्ये अपर पोलीस अधीक्षक (भोकर), उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार अशा एकूण २७ अधिकाऱ्यांसह ९८ कर्मचाऱ्यांचा ताफा सहभागी झाला होता. यामध्ये प्रामुख्याने सोनखेड आणि उस्माननगर पोलीस ठाण्यांच्या पथकांनीही सक्रिय सहभाग नोंदवत शहरातील संवेदनशील भागांत शोधमोहीम राबवली.
​कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी तडीपार केलेले ४१ गुन्हेगार, MPDA अंतर्गत सुटलेले २६ गुन्हेगार आणि शरीराविरुद्ध गुन्हे करणारे ५५ सराईत गुन्हेगार तपासून पाहिले. यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करताना आर्म्स ॲक्ट अंतर्गत ४ गुन्हे दाखल करण्यात आले, तर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ अन्वये २ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच, भाग्यनगर पोलीस ठाण्यातील एका पाहिजे असलेल्या आरोपीलाही या मोहिमेत अटक करण्यात आली आहे.
​गेल्या काही दिवसांतील कारवाईचा आढावा घेतल्यास, ६ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांची तपासणी झाली आहे. हद्दपार केलेल्या व्यक्तींची तपासणी करताना ८ आरोपी शहरातच मिळून आल्याने त्यांच्यावर कलम १४२ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. एकूण मोहिमेत १०२ आरोपींविरुद्ध कारवाई करत ८९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) १५ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
​नांदेड पोलीस दलाने राबविलेल्या या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून, शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेड महानगरपालिकेचा दुजाभाव: छोट्या जाहिरात व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा, बड्या धेंडांना मात्र अभय!

      नांदेड: छोट्या जाहिरात व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा आणि बड्या धेंडांना मात्र अभय देण्यात येत असल्याचा आरोप शहरातील सर्व छोटे डिझायनर्स, फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायिक आणि होर्डिंग व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनी केला आहे.…

    Continue reading
    गोदावरी नदी पात्रात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

    गोदावरी नदी पात्रात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू नांदेड : शहरातील साठे चौक परिसरातील तीन लहान मुले गोदावरी नदीच्या नगीना घाट येथे पोहण्यासाठी गेली असताना, त्यातील दोन मुलांचा पाण्यात बुडून…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेड महानगरपालिकेचा दुजाभाव: छोट्या जाहिरात व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा, बड्या धेंडांना मात्र अभय!

    नांदेड महानगरपालिकेचा दुजाभाव: छोट्या जाहिरात व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा, बड्या धेंडांना मात्र अभय!

    गोदावरी नदी पात्रात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

    गोदावरी नदी पात्रात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

    विद्युत विभागाचे प्रमुख सतीश ढवळे निलंबित; मनपा आयुक्तांची कारवाई वादाच्या भोवऱ्यात

    विद्युत विभागाचे प्रमुख सतीश ढवळे निलंबित; मनपा आयुक्तांची कारवाई वादाच्या भोवऱ्यात

    महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँ

    महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँ

    नारायणा स्कूलचा असंवेदनशील कारभार; ४२ अंश तापमानात विद्यार्थ्यांना भर उन्हात जेवण्यास पाडले भाग