उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या नांदेडात सांत्वनपर दौरा
नांदेड – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या, ६ ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांच्या पत्नी स्नेहलता पाटील-खतगावकर यांच्या निधनानंतर ते सांत्वनपर भेट देणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उद्या दुपारी १.२० वाजता श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळ, नांदेड येथे विमानाने आगमन होईल. त्यानंतर ते मोटारीने माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांच्या निवासस्थानी, साई निवास, राजेंद्रनगर, नांदेड येथे पोहोचतील. दुपारी १.३० वाजता दिवंगत स्नेहलता पाटील-खतगावकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करतील.
सांत्वनपर भेटीनंतर दुपारी २.२५ वाजता ते पुन्हा श्री गुरु गोविंद सिंघजी विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर दुपारी २.३० वाजता हेलिकॉप्टरने बीडकडे प्रयाण करतील.






