नांदेडमध्ये विनापरवाना व अवैध वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; एकाच दिवसात २३३ केसेस

नांदेडमध्ये विनापरवाना व अवैध वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; एकाच दिवसात २३३ केसेस

नांदेड शहरात वाढत असलेली वाहतूक कोंडी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा, वजिराबादने कडक मोहीम हाती घेतली आहे. या कारवाई अंतर्गत विनापरवाना वाहने, अवैध प्रवासी वाहतूक आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मंगळवार, १७ मार्च रोजी शहराच्या विविध मुख्य चौकांमध्ये करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे बेशिस्त वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व त्यांच्या पथकाने रेल्वे स्टेशन रोड, वजिराबाद चौक, कलामंदिर, वर्कशॉप, राजकॉर्नर आणि छत्रपती चौक या ठिकाणी नाकाबंदी करून कागदपत्रांची कसून तपासणी केली. या मोहिमेत विनापरवाना वाहने, ट्रिपल सीट दुचाकी, गणवेश नसलेले रिक्षाचालक आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर एकूण २३३ केसेस दाखल करण्यात आल्या असून, त्यांच्याकडून २ लाख ३१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी आपली वाहने नियुक्त पार्किंगच्या ठिकाणीच उभी करावीत आणि रस्त्यावर फळगाड्या लावून अतिक्रमण करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सिग्नलचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, अन्यथा मोटार वाहन कायद्यानुसार यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रह्मे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष…

    Continue reading
    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    नांदेड शहरात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव; निधी व जागा संपादन करण्याबाबत सभेत घेतला जाणार निर्णय नांदेड: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा सोमवार,…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेडमध्ये विनापरवाना व अवैध वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; एकाच दिवसात २३३ केसेस

    नांदेडमध्ये विनापरवाना व अवैध वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; एकाच दिवसात २३३ केसेस

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन