लातूर आणि नांदेडमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; पिस्तुलसह ८ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त

लातूर आणि नांदेडमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; पिस्तुलसह ८ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त

नांदेड : परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि नांदेड शहरातील इतवारा भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत पोलिसांनी रोख रकमेसह, मोबाईल आणि एक गावठी पिस्तुल असा एकूण ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दि. २७ जानेवारी रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाईक चौकात रमेश गिरी याच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १ लाख ५ हजार २०० रुपये रोख आणि ७० हजार रुपयांचे १२ मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासोबतच ३० जानेवारी रोजी नांदेडमधील मच्छी मार्केट परिसरातील जुगार अड्ड्यावर पथकाने छापा टाकला. तेथे जुगार खेळणाऱ्या २५ व्यक्तींकडून २ लाख ३४ हजार १०० रुपये रोख आणि ४ लाख २८ हजार रुपयांचे २७ मोबाईल जप्त केले.
इतवारा हद्दीतच जयकिशन ऊर्फ जय राजेशसिंह ठाकूर (वय २१ वर्ष, रा. उल्हासनगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३१ हजार ५०० रुपये किमतीचे एक गावठी पिस्तुल आणि ३ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या दोन्ही ठिकाणच्या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ३ लाख ४० हजार रुपये रोख रक्कम,
५ लाख रुपये किमतीचे ३९ मोबाईल, १ गावठी पिस्तुल व ३ जिवंत काडतूस, ज्याची
एकूण किंमत ८ लाख ६८ हजार ८०० रुपये इतकी आहे.
सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड व त्यांच्या पथकातील अंमलदार प्रदिप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी आणि विलास सुरवसे यांनी यशस्वी केली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकास १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास किंवा ‘खबर’ हेल्पलाइन क्रमांक ९१ ५० १०० १०० वर कळवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेडमध्ये विनापरवाना व अवैध वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; एकाच दिवसात २३३ केसेस

    नांदेडमध्ये विनापरवाना व अवैध वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; एकाच दिवसात २३३ केसेस नांदेड शहरात वाढत असलेली वाहतूक कोंडी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर…

    Continue reading
    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रह्मे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेडमध्ये विनापरवाना व अवैध वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; एकाच दिवसात २३३ केसेस

    नांदेडमध्ये विनापरवाना व अवैध वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; एकाच दिवसात २३३ केसेस

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची तडजोड

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन