३१ डिसेंबर व नववर्ष स्वागतासाठी नांदेड पोलीस सज्ज; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

३१ डिसेंबर व नववर्ष स्वागतासाठी नांदेड पोलीस सज्ज; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

​नांदेड- ३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागताचा उत्साह सर्वत्र दिसून येत असताना, नांदेड शहर आणि जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. सध्या नांदेड शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर, नववर्षाचा आनंद साजरा करताना जनतेने आचारसंहितेचे आणि जमावबंदीच्या आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी केले आहे.
​नववर्षाच्या पूर्वसंध्येला नांदेड शहर व ग्रामीण भागात व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जाणार असून, ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ रोखण्यासाठी ‘ब्रिथ अनालायझर’द्वारे तपासणी केली जाईल. शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही (CCTV) आणि हॅन्ड सेल्फ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. रस्त्यावर हुल्लडबाजी करणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, केक कापून गोंधळ घालणे, बुलेटचा आवाज काढणे किंवा दारू पिऊन वाहन चालवणे अशा प्रकारच्या कृत्यांवर पोलीस कठोर कायदेशीर कारवाई करणार आहेत.
​या विशेष बंदोबस्तासाठी नांदेड पोलीस दलाचे मोठे संख्याबळ रस्त्यावर उतरणार आहे. यामध्ये १ पोलीस अधीक्षक, २ अपर पोलीस अधीक्षक, ९ उपविभागीय पोलीस अधिकारी, ४० पोलीस निरीक्षक, १७० पोलीस अधिकारी आणि १२०० पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. तसेच १२ दंगा नियंत्रण पथके, २० स्ट्रायकिंग फोर्स आणि १३०० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये आणि काही तक्रार असल्यास तात्काळ ‘डायल ११२’ किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिले आहेत.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    नांदेड शहरात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव; निधी व जागा संपादन करण्याबाबत सभेत घेतला जाणार निर्णय नांदेड: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा सोमवार,…

    Continue reading
    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा नांदेड: येथील मोदी मैदानावर केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मोठ्या थाटामाटात संपन्न झालेल्या ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या चकाकीमागे सफाई कामगारांचे श्रम मात्र…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन