नांदेडात ऑटोमध्ये चालकाकडून महिलेचा विनयभंग; भाग्यनगर पोलिसांनी ऑटोचालकाला १६ तासांत केली अटक

भाग्यनगर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: विनयभंग करणाऱ्या ऑटोचालकाला १६ तासांत अटक करून दोषारोपपत्र दाखल

नांदेड – शहरातील भाग्यनगर पोलिसांनी ‘मिशन निर्भया’ अंतर्गत महिला सुरक्षेबाबत एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. एका ऑटोचालकाने महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी, पोलिसांनी घटनेच्या १६ तासांच्या आत आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या जलद कारवाईमुळे समाजात पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार, दि. ५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास श्रीनगर, नांदेड येथील पंचशील ड्रेसेससमोर एका महिलेचा ऑटोचालकाने विनयभंग केल्याची घटना घडली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली.
त्यानंतर, नांदेडचे पोलीस अधीक्षक अबीनाशकुमार यांनी “मिशन निर्भया” अंतर्गत महिला व बाल सुरक्षा संबंधित गुन्ह्यांमध्ये तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनुसार, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ गजानन किडे, विशाल माळवे, नागेश वाडियार, धनंजय कुंवरवार यांना तात्काळ पीडित महिला आणि ऑटोचालकाचा शोध घेण्याचे आदेश दिले.
पथकाने सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे पीडित महिलेचा शोध घेतला आणि त्यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४, ७५(२) अंतर्गत गुरनं-३९०/२०२५ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे यांनी ऑटो क्रमांक MH-26/N-5057 चा चालक, आरोपी शेख इम्रान शेख हरुनसाब (वय २४, रा. नवी आबादी, नांदेड) याचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून अवघ्या १६ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक, अबीनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक, खंडेराय धरणे, भोकर; नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक, सुरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग नांदेड शहर सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ गजानन किडे, विशाल माळवे, नागेश वाडियार, धनंजय कुंवरवार, मपोहेकॉ सविता केळगंद्रे, पोकों गंगुलवार आणि गुट्टे यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली.
यापूर्वी सिंदखेड, माहूर आणि रामतीर्थ पोलिसांनीही महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये २४ तासांच्या आत दोषारोपपत्र दाखल केले आहे.
नांदेडचे पोलीस अधीक्षक अबीनाशकुमार यांनी यापुढे ऑटोमधील महिला किंवा मुली प्रवाशांची कोणी छेडछाड करत असल्यास, तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा ११२ डायल करून तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. भाग्यनगर येथील पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    बसस्थानकांवरील महिला चोरट्यांची टोळी जेरबंद; ५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

    बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील आणि पर्समधील दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश नांदेड: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील आणि पर्समधील दागिने लंपास करणाऱ्या…

    Continue reading
    नांदेड-गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा; ‘फ्लाय-91’ कडून दोन विमानांसाठी भाडेकरार पूर्ण

    नांदेड-गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा; ‘फ्लाय-91’ कडून दोन विमानांसाठी भाडेकरार पूर्ण ​नांदेड – येथील श्री गुरुगोबिंद सिंघजी विमानतळावरून प्रलंबित असलेली विमानसेवा पुन्हा सुरू होण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे.…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बसस्थानकांवरील महिला चोरट्यांची टोळी जेरबंद; ५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

    बसस्थानकांवरील महिला चोरट्यांची टोळी जेरबंद; ५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड-गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा; ‘फ्लाय-91’ कडून दोन विमानांसाठी भाडेकरार पूर्ण

    नांदेड-गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा; ‘फ्लाय-91’ कडून दोन विमानांसाठी भाडेकरार पूर्ण

    नांदेड येथील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी १० आरोपींना ठोकल्या बेड्या; अवघ्या २४ तासात केले जेरबंद

    नांदेड येथील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी १० आरोपींना ठोकल्या बेड्या; अवघ्या २४ तासात केले जेरबंद

    ३९ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्या उदघाटन

    ३९ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्या उदघाटन

    ३१ डिसेंबर व नववर्ष स्वागतासाठी नांदेड पोलीस सज्ज; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

    ३१ डिसेंबर व नववर्ष स्वागतासाठी नांदेड पोलीस सज्ज; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

    नायगाव पोलिसांची मोठी कारवाई: तलवीड शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा, १२ जणांना अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

    नायगाव पोलिसांची मोठी कारवाई: तलवीड शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा, १२ जणांना अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त