“जीबीएस” या दुर्मिळ आजारानेग्रस्त तरुण उपचारानंतर पूर्णपणे बरा; नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची किमया 

“जीबीएस” या दुर्मिळ आजारानेग्रस्त तरुण उपचारानंतर पूर्णपणे बरा; विष्णुपुरी नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची किमया 

नांदेड – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी नांदेड येथे अपघात विभागात GBS (Guillain-Barre Syndrome) ने ग्रस्त असलेला एक 25 वर्षीय तरुण जेव्हा उपचारासाठी दाखल झाला होता तेव्हा तो चालू शकत नव्हता, बोलू शकत नव्हता व ‍गिळू शकत नव्हता. काही तासांमध्ये श्वासोच्छवासाची क्रिया मंदावली त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले व कृत्रिम श्वासोच्छवास चालू ठेवला गेला. सदर रुग्णांवर प्राध्यापक डॉ. शीतल राठोड व प्रमुख औषधवैद्यकशास्त्र यांचे मार्गदर्शनाखाली एक विशेष आसीयू टिम तयार करण्यात आली होती. सदर टिममध्ये डॉ. उबेद खान, डॉ.कपिल मोरे, डॉ.अंजली देशमुख व डॉ.फारुखी, सहयोगी प्राध्यापक व डॉ. अमितकुमार पोतुलवार व डॉ. मोहन भंडारे सहायक प्राध्यापक होते.

जीबीएस GBS हा प्रकार या दुर्मिळ आजारात आणि झपाट्याने वाढणाऱ्या मज्जास्नायूंच्या आजारामुळे रुग्णाचे शरीर पूर्णतः अकार्यक्षम झाले होते. रुग्णाचे दोन्ही हात व पाय असून नसल्यासारखे Intravenous Immunoglobulin (IVIG) थेरपीसह सातत्यपूर्ण व्हेंटिलेटर व्यवस्थापन आवश्यक ते तातडीचे औषधउपचार करण्यात आले. सदर रुग्ण हा 42 दिवस व्हेंटिलेटरवर कृत्रिम श्वासोच्छवासावर वरिष्ठ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार हे सुरू होते. सदर रुग्णास आवश्यकते प्रमाणे फिजिओथेरपी व मानसरोग तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात आले. सदर रुग्ण हा तब्बल 85 दिवसाच्या उपचारानंतर हळूहळू हालचाल करू लागला. सदर रुग्ण हा आज बोलतोय, हसतोय आणि डॉक्टरांचे आभार मानत घरी जातांना त्याने व त्याच्या नातेवाईक यांनी आनंद व्यक्त केला.

GBS (Guillain-Barre Syndrome) या दूर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णावर डॉक्टर व परिचर्या संवर्गातील कर्मचारी यांनी जे अथक पूर्ण शर्तीचे उपचार करुन हे साध्य झाल्याचे समाधान व आनंद डॉ.विजयकुमार कापसे, वैद्यकीय अधीक्षक व डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता महोदय डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड यांनी व्यक्त केले.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन ​लातूर/कवठा: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू, माजी खासदार आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांचे दुःखद…

    Continue reading
    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद नांदेड: शासकीय पोर्टलचा गैरवापर करून हजारो बनावट जन्म नोंदी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा उस्माननगर पोलिसांनी पर्दाफाश केला…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

    गोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न 

    गोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न 

    मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात ‘अबू शूटर’कडून तरुणावर जीवघेणा हल्ला; टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय

    नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात ‘अबू शूटर’कडून तरुणावर जीवघेणा हल्ला; टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय