अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; 30 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; 30 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड – सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज समाजकल्याण आयुक्तालय,म.रा.पुणे यांचे स्तरावर 30 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन पुणे समाज कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरीया यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये पदव्युत्तर पदवी व संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएचडी) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. तथापि सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (QX World University Ranking) 200 च्या आतील परदेशात शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यापैकी 30 टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येते. त्यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    नांदेड शहरात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव; निधी व जागा संपादन करण्याबाबत सभेत घेतला जाणार निर्णय नांदेड: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा सोमवार,…

    Continue reading
    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा नांदेड: येथील मोदी मैदानावर केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मोठ्या थाटामाटात संपन्न झालेल्या ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या चकाकीमागे सफाई कामगारांचे श्रम मात्र…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन