३८ व्या अ. भा. बौद्ध धम्म परिषदेचे सोमवारी उदघाटन देश विदेशातील भिक्खु होणार सहभागी

३८ व्या अ. भा. बौद्ध धम्म परिषदेचे सोमवारी उदघाटन
देश विदेशातील भिक्खु होणार सहभागी
नांदेड – प्रतिवर्षी प्रमाणे महाविहार बावरीनगर दाभड नांदेड येथे याही वर्षी पौष पौर्णिमेला म्हणजेच दि. १३ व १४ जानेवारी २०२५ रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. ‘भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा’ चे संस्थापक अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न होणार आहे.
दि . १३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ५:३० ते ६:३० वा त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ, ८:३० वा महाबोधि वंदना, ९:३० वा धम्म ध्वजारोहण व ९:४० पासून धम्म उपदेश होईल. दुपारी ठीक २:०० वा. महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत धम्मयान संचलन, सायं. ६.०० वा बुद्ध रुपाची प्रतिष्ठापना समारंभ, सायं. ठीक ७.०० वा ३८ व्या अ. भा. बौद्ध धम्म परिषदेच्या उदघाटन समारंभास सुरुवात होईल. त्यानंतर धम्म देसनेस प्रारंभ होईल.
परिषदेच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच दि. १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते ११.३० दरम्यान वधू – वर परिचय मेळावा व ११.३० वा सामूहिक मंगल परिणय विधी, ११.३० ते १२.३० व्यसन मुक्ती प्रतिज्ञा, १२.३० वा धम्म ज्ञान परीक्षा प्रमाणपत्र वितरण, दुपारी १ पासून रात्री १० वाजेपर्यंत पूजनीय भिक्खु संघातर्फे निरंतर धम्मदेसणा होईल.
या दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत भिक्खु अतुरालीय रतन थेरो, भिक्खु नेलुवेल आनंद थेरो, भिक्खु कोनगहदिनिये पलित थेरो, भिक्खु पुत्तलमे दियसेन थेरो, व इतर आठ भिक्खु तथा थायलंड या देशातून फ्रा येन्वीन थेरो, भिक्खु लकी, भिक्खु नऱ्ओंग तसेच जपान व दक्षिण कोरिया येथील भिक्खु गण, त्याचप्रमाणे भारतातून भिक्खु खेमधम्मो महाथेरो (मुळावा जि. यवतमाळ), भिक्खु महापंथ महाथेरो (नागपूर), भिक्खु बोधिपालो महाथेरो ( छ. संभाजीनगर ), भिक्खु विशुद्धानंद महाथेरो(बुद्धगया), भिक्खु प्रज्ञादीप महाथेरो-महासचिव अ. भा. भिक्खु संघ बुद्धगया, भिक्खु डॉ. ज्ञानदीप महाथेरो(नागपूर), भिक्खु डॉ. एम. सत्यपाल थेरो, भिक्खु ज्योतिरत्न थेरो (नागपूर), भिक्खु एस. काश्यपायन थेरो (जयसिंगपूर), भिक्खु विणयबोधिप्रिय थेरो, भिक्खु धम्मानंद थेरो (बिदर), भिक्खु महाविर्यो (अहमदपूर), भिक्खु ज्ञानरक्षित (छ. संभाजीनगर), भिक्खु धम्मशील (सारनाथ), भिक्खु बुद्धदत्त (बेंगलोर) आदी देश विदेशातील विद्वान भिक्खु सदर परिषदेमध्ये संमिलित होणार आहेत. सर्व जनतेने शुभ्र वस्त्र परिधान करत अधिकाधिक संख्येत सहभागी होऊन धम्म श्रवणाने लाभान्वित होण्याचे आवाहन धम्म परिषदेचे संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    बसस्थानकांवरील महिला चोरट्यांची टोळी जेरबंद; ५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

    बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील आणि पर्समधील दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश नांदेड: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील आणि पर्समधील दागिने लंपास करणाऱ्या…

    Continue reading
    नांदेड-गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा; ‘फ्लाय-91’ कडून दोन विमानांसाठी भाडेकरार पूर्ण

    नांदेड-गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा; ‘फ्लाय-91’ कडून दोन विमानांसाठी भाडेकरार पूर्ण ​नांदेड – येथील श्री गुरुगोबिंद सिंघजी विमानतळावरून प्रलंबित असलेली विमानसेवा पुन्हा सुरू होण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे.…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बसस्थानकांवरील महिला चोरट्यांची टोळी जेरबंद; ५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

    बसस्थानकांवरील महिला चोरट्यांची टोळी जेरबंद; ५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड-गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा; ‘फ्लाय-91’ कडून दोन विमानांसाठी भाडेकरार पूर्ण

    नांदेड-गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा; ‘फ्लाय-91’ कडून दोन विमानांसाठी भाडेकरार पूर्ण

    नांदेड येथील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी १० आरोपींना ठोकल्या बेड्या; अवघ्या २४ तासात केले जेरबंद

    नांदेड येथील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी १० आरोपींना ठोकल्या बेड्या; अवघ्या २४ तासात केले जेरबंद

    ३९ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्या उदघाटन

    ३९ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्या उदघाटन

    ३१ डिसेंबर व नववर्ष स्वागतासाठी नांदेड पोलीस सज्ज; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

    ३१ डिसेंबर व नववर्ष स्वागतासाठी नांदेड पोलीस सज्ज; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

    नायगाव पोलिसांची मोठी कारवाई: तलवीड शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा, १२ जणांना अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

    नायगाव पोलिसांची मोठी कारवाई: तलवीड शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा, १२ जणांना अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त